कोरोनाबाधितांचे मृत्यू लपवणार्‍यांवर कारवाई करा.!

MH13 News Network
भाजपाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
कोरोनाबाधितांचे 40 मृत रूग्ण लपवणे ही धक्कादायक आणि गंभिर बाब आहे. एवढेच रूग्ण आहेत की आणखी काही रूग्ण लपवले आहेत, हे पहावे लागेल. सोलापूर जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार झाकण्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने खा. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी खा. महास्वामी, आ. देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली, त्यानंतर पत्रकारांशी आ. देशमुख बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार म्हटल्यावर प्रशासनाकडून लपवलेली मृत्यू संख्या बाहेर आली.   हे 40 मृत रूग्ण कोणी आणि कशासाठी लपवले, यात कोणाची चूक आहे, दोषी कोण आहेत, आणखी किती जणांच्या मृत्यूची नोंद केली नाही याची उत्तरे मिळाली पाहिजेत. जिल्हाधिकार्‍यांनी याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना शिष्टमंडळाने केल्या. याशिवाय बांधावर खते व बियाणे योजनेचा बोजवारा उडाला आहे. शेतकर्‍यांना बियाणे देण्याचे नियोजन करावे, शेतकर्‍यांना पीक कर्ज त्वरित द्यावे, शेतकर्‍यांच्या दोन लाखांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी, शेतकर्‍यांचे कापूस, चना, तुरीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना त्वरित पैसे मिळावेत, ग्रामीण भागातील कामगारांसाठी मनरेगाची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्वरित या मागण्या मान्य न झाल्यास भाजपातर्फे जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

19 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

22 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

23 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago