जिल्हा युवा पुरस्कार प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

0
28

by -MH13News,network 

२६ जानेवारी आणि १ मे महाराष्ट्र दिन व १५ ऑगस्ट या दिवशी दिला जाणारे जिल्हा युवा पुरस्कार राज्य शासनाच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून दिले जातात, पण मागील ४ वर्षांपासून यासाठी मुबलक निधीही उपलब्ध असतांना सुध्दा या पुरस्कारा पासून युवक-युवती,संस्थांना वंचित ठेवत असल्याचे चित्र पहावायस मिळत आहे त्यामुळे जिल्हा युवा पुरस्कार प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीने आज मंगळवारी करण्यात आली.

व्यक्ती समाजासाठी चांगले काम करतात त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणूनच हे पुरस्कार जिल्हा व राज्य स्तरावर दिले जातात पण यांच्या आडमुठपणाच्या धोरणामुळे पुरस्कार मागील चार वर्षापासून प्रलंबित ठेवलेला आहे . या मागचे कारण अद्याप कोणालाच समजू शकलेले नाही.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींना बक्षिससह पुरस्कार देवून सम्मान करण्यात येतो. २६ जानेवारी व १ मे महाराष्ट्र दिन या वर्षातला झालेला असल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी
सदरचे पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या युवक-युवतींना व संस्थांना देण्याची ‘प्रहार’ची मागणी आहे. येत्या उद्याच्या १५ ऑगस्ट रोजी जर जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय पुरस्कार जाहिर करून देण्यात आले नाही तर ‘प्रहार’चे वतीने १५ ऑगस्ट रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ताब्यात घेऊन आंदोलन केले जाईल मग होणाऱ्या परिणामास जिल्हा क्रीडा  अधिकारी व त्यांचे इतर अधिकारी कर्मचारी हेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी .
अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले . या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी , शहर संपर्क प्रमुख जमीर शेख , कार्याध्यक्ष खालील मणियार , उपप्रमुख संभाजी व्हनमारे , मुदस्सर हुंडेकरी , माेहसीन तांबाेळी (वळसंग) जाबीर सगरी, सचिन वेणेगुरकर, प्रणव शेंडे, मनिषा भाेसले आदी उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here