ब्रेकींग : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

0
242

ब्रेकींग: सुषमा स्वराज यांचं निधन

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झाले आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुषमा स्वराज यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यांना आज रात्री ९ च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यावेळी त्या बेशुद्ध होत्या.

आज सायंकाळी 7 वाजता स्वराज यांनी ट्वीट करुन जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हजर झाले आहेत.

सुषमा स्वराज यांनी सोलापूरला पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी फार मदत केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here