येत्या मंगळवारी सुशीलकुमार शिंदे यांचा चपळगाव दौरा

गोळा बेरीज होतेय सुरू

0
7

MH13NEWS ,नेटवर्क

सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात चपळगावला सभागृहासाठी पंचवीस लाखांचा निधी दिला होता. चपळगावचे तत्कालीन सरपंच स्व सुर्यकांत बाणेगाव यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यानंतर या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

येत्या मंगळवारी दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता चपळगाव येथे या सभागृहाचे उदघाटन करण्यात येणार आहे.यासमयी सुशीलकुमार शिंदे यांना चपळगावचे युवा नेते तथा स्व.सुर्यकांत बाणेगांव यांचे सुपूत्र बसवराज बाणेगांव यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.यास शिंदे साहेबांनी निमंत्रण स्वीकारले असून त्याच दिवशी कार्यकर्ता मेळाव्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यावेळी युवा नेते समाधान होटकर देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here