‘आरे’तील वृक्षतोडीवर सुप्रीम कोर्टात आजच सुनावणी

पर्यावरण प्रेमींमध्ये मोठा संताप

0
63

मुंबई, प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरण प्रेमी मध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि निषेध व्यक्त करण्याचे कारण म्हणजे आरे मधील झालेली वृक्षतोड. मुंबईकरांसाठी ऑक्सिजन असलेलं आरे मधील जंगल हे आता अस्मितेचे प्रतीक जंगल हे आता अस्मितेचे प्रतीक बनलं आहे.

मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरेच्या जंगलातील झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे.विशेष म्हणजे भर रात्री ही कत्तल सुरू होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधलं गेलं.न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.

विधी शाखेच्या काही विद्यार्थ्यांनी एका पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं.त्यावर कोर्टाने जनहितार्थ सुमोटो याचिका दाखल करून घेतली असून या याचिकेवर आजच सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीसाठी विशेष पीठ गठित करण्यात आले असून त्यापुढे याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पर्यावरण प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर निषेध नोंदवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here