Categories: राजकीय

संकल्प सिद्धी करण्यासाठी सुभाष देशमुखांना साथ द्या : कॅबिनेट मंत्री कुंवरजी बावलीया

कोळी समाजाचे प्रश्न ऐकायला काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारकडे वेळ नव्हता. आजवर आपल्या समाजाला कोणीही महत्व दिले नव्हते, परंतु २०१४ ला अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कोळी समाजाला कॅबिनेटमध्ये तसेच विधानपरिषदेत स्थान देऊन समाजाला न्याय देण्यासाठी मुहूर्तमेढ रोवली, आणि कार्य तत्परतेने कृती करत प्रलंबित प्रश्नांच्या निपटाऱ्यासाठी उच्च न्यायालयात कोअर कमिटी नेमून अहवाल तयार केला असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री गुजरात सरकार, तथा अखिल भारतीय कोळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष कुंवरजी बावलीया यांनी केले.


दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ भाजप, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी मयूर मंगल कार्यालय येथे सभा पार पडली. महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांना अभिवादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. समाजाला प्रवाहात आणण्यासाठी वर्षानुवर्षे दुर्लक्षीत प्रश्न सोडविण्यासाठी संकल्प सिद्ध करण्यासाठी दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुखांना आणि महाराष्ट्रात सर्व महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या असे आवाहन मंत्री बावलीया यांनी यावेळी केले.
खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी उपस्थित जनसमुदायाला वाल्मिकी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत, गुण गौरव केला. सुभाष बापू निवडून येणार हे सत्य असले तरी, मताधिक्याचा विचार करून बहुमत मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुभाष देशमुख म्हणाले, देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र उत्तम कामगिरी बजावत आहेत, देश प्रगती करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त दक्षिण सोलापूर नाही तर सोलापूर जिल्हा नावारूपाला आणायचा आहे. सोलापूरच वैभव जगभरात पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोळी समाज बांधवांनी आपल्या समस्या कधीही सांगा मी त्या सोडविण्यासाठी बांधील आहे. आपले आशीर्वादरुपी मत २१ ऑक्टोबर रोजी मतपेटीतून द्या असे आवाहन केले.
विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी बोलताना, जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक अडचणी, मागासलेपण अशा विविध विषयांवर प्रकाश टाकून येत्या काळात खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे कोळी समाजाच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे, भाजप महायुतीच्या पाठीशी उभारून समाजाची ताकत दाखवून देऊ असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोळी समाजासाठी भारतीय जनता पक्षच काम करण्याची धमक ठेवतो. समाजाचा मागासलेपण घालविण्यासाठी आपला आशीर्वाद सर्व महाराष्ट्रातील भाजप मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांना देऊन, त्यांना सेवेची संधी द्या, असे आवाहन भाजप नेते प्रा. अशोक निंबर्गी यांनी प्रास्ताविकातून केले. यावेळी दक्षिण सोलापूर पं. स. सदस्य, होनमुर्गीचे राजू कोळी यांनी यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. कोळी समाज मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, समाज नेते लक्ष्मीकांत निंबाळकर, युवा नेते नागेश बिराजदार, पं. स. सदस्य महादेव कमळे, भाजप नेते अविनाश कोळी, वैशाली कोळी, चंद्रकांत खुपसंगे व कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुभाष देशमुख यांना गुरव समाजाचा जाहिर पाठिंबा
गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोकाशी यांच्या सह गुरव समाज बांधवांनी दक्षिण भाजप महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदन देऊन सत्कार केला. यावेळी किशोर पाटील, सुनील पाटील, गोपाळ चौगुले, शशिकांत जिद्दीमनी, काशिनाथ मेळगिरी, जयश्री चौगुले, रंगा गुरव, विनोद चौगुले आदी उपस्थित होते.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

1 hour ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

15 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

16 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

20 hours ago

BREAKING: महाशिवआघाडी – सरसकट कर्जमाफी आणि 24 तास वीज प्राधान्यक्रमावर!

MH13 NEWS NETWORK: राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद…

20 hours ago

वाचा: रमेश कुमार यांचा “हा” निर्णय दलबदलू आमदारांना एक धडा

कर्नाटक विधानसभेचे स्पीकर रमेश कुमार यांनी संविधानाच्या मर्यादेत राहत आणि सभागृहचे स्पीकर या नात्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्या 17…

21 hours ago