सोलापूर | ‘रविवारी’ सर्व बाजारपेठ असेल सुरु ;असा साजरा करा ‘गणेशोत्सव’…

MH13News Network

राज्य शासनाने कोरोना विषयक उपाययोजना संदर्भात लॉकडाउन बाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केल्या होत्या, त्या अनुषंगाने भारतीय साथरोग अधिनियमानुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये महापालिका आयुक्तांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दोन्ही बाजूचे दुकाने सध्याच्या सणासुदीच्या दिवसाचा विचार करता रविवार दिनांक 23-8-2020 रोजी चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याचा सुधारित आदेश काढला आहे.

असा साजरा करावा ‘गणेशोत्सव’…

“कोव्हिड – १९” ची साथ लक्षात घेता तसेच पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेता नागरिकांनी घरीच गणेशमूर्तीचं विसर्जन करावं, असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर यांनी केलेलं आहे. घरच्या घरी विसर्जन करणं सोपं जावं यासाठी २ फुटच्या मर्यादित शाडूच्या / मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं असंही सोलापूर महानगरपालिके कडून आवाहन करण्यात आले आहे.

तसेच गणेशोत्सव साजरा करीत असताना पर्यावरणपूरक होईल, तसेच या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा.

“कोव्हिड – १९” ची साथ लक्षात घेता सांस्कुतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरात प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.असे आवाहन सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

8 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago