कोरोनाशी यशस्वी लढा, उपचारानंतर 11 रुग्ण झाले बरे

MH13NEWS Network

नवी दिल्ली – जगभरासह देशात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच एक आनंदाची बातमी भारतीयांसाठी आली आहे. देशात कोरोना व्हायरसची लागण झालेले 11 रुग्ण यशस्वी उपचार घेतल्याने  बरेही झाले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यात समावेश असलेल्या केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार याशिवाय दिल्लीतील 7 आणि तेलंगानातील एकमात्र कोरोना बाधित रुग्णही बरा झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एका कॅनाडाच्या नागरिकाचा समावेश आहे. यो कोरोना बाधितांच्या  संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या शिवाय प्रमुख आणि छोट्या बंदरांवर एकूण 25 हजार 504 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लँडपोर्टवर 14 लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

अशी आहे परिस्थिती…

भारत सरकारने सामुहिक देखरेखीअंतर्गत जवळपास 42,296 प्रवाशांची तपासणी केली आहे. यातील 2,559 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर 522 लोकांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या शिवाय देशातील 30 विमानतळांवर एकूण 10 हजार 876 उड्डानांमध्ये 11 लाख 71 हजार 061 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 3,062 प्रवाशांसह 583 संपर्कात आलेल्या लोकांची ओळख करून त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago