साब… रोटी चांद-सूरज जैसी लगती है ! दिखती हैं मगर हाथ आती नहीं..-परिवहन कर्मचारी

By-MH13 NEWS,वेब/टीम

क्या करे साब..थू… ऐसी जिंदगनी पर…! एक वर्षापासून पगार नाही. लेकरांना वह्या पुस्तकं नाहीत. बायकोला नीटशी साडी नाय.आई-बापाला दवाखान्याला औषधं नाहीत .. कामावर येतो ,काम करतो ,निघून जातो..साब… रोटी चांद – सूरज जैसी लगती है ! दिखती हैं मगर हाथ आती नहीं..असे तळमळीचे उद्गार एका परिवहन कर्मचारीने MH13NEWS प्रतिनिधीशी बोलताना काढले.

परिवहन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे .मंगळवारपासून पुकारलेल्या संपा संदर्भात अधिक माहिती घेत असल्याचे पाहून एका कर्मचाऱ्याने ‘ पगार टाइम पर होती नई..मट्टी खाने का वक्त आया असे भावनिक उदगार काढून आपली प्रापंचिक व आर्थिक विवंचना प्रतिनिधी समोर मांडली.यावेळी त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

आधी दाम मगच काम ..

परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि.२२ जानेवारीच्या पहाटेपासून संप पुकारल्याने शहरातील बससेवा ठप्प झाली आहे. दोन महिन्याचे थकीत वेतन दिल्याशिवाय कामावर न येण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर नोटीस न देता परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा इशारा परिवहन प्रशासनाने दिला आहे.परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली आहे .

मागील अकरा महिन्याचे थकीत वेतन मिळावे यासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी या यापूर्वी कोर्टात धाव घेतली आहे .त्या अकरा महिन्याचे वेतन सोडून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना अद्याप देण्यात आले नाही. ते थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

मध्यंतरी महानगरपालिकेने परिवहन विभागाला ११ कोटी रुपये दिले होते. त्यातील १० कोटी १५ लाख रुपये हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन देण्यातच खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे.

थकीत वेतनासाठी यापूर्वी १७ व १८ डिसेंबर रोजी महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सभापती तुकाराम मस्के यांच्या प्रयत्नातून कर्मचारी वेतन देण्यात आल्याने त्यावेळी तो संप मागे घेण्यात आला होता. ९ जानेवारी रोजी ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते .मात्र सभापती तुकाराम मस्के यांनी मध्यस्थी करून कोणत्याही परिस्थितीत २० जानेवारीपर्यंत वेतन देण्याचा शब्द कर्मचाऱ्यांना दिला होता.

महिला व बालकल्याण मोफत प्रवास सेवा अनुदानाचे ६९ लाख , अंध -अपंग, स्वातंत्र्यसैनिक, मूक – बधिर यांना मोफत प्रवासाची सवलत दिल्याबद्दल ८३ लाख ५२ हजार रुपये असे एकूण १ कोटी ५२ लाख ५२ हजार रुपये महानगरपालिकेकडून येणे आहेत .मात्र महानगरपालिका प्रशासन परिवहनच्या ‘देण्या’कडे गंभीरपणे पाहत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी अशी प्रतिक्रिया परिवहन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago