पंढरपूरातील भाऊराव पाटील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर

By-MH13NEWS,नेटवर्क

पंढरपूर – राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १२ व  २४  वर्षाची आश्वासित प्रगती योजना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. या विरोधात राज्यभरातील सर्व शासकीय महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिनांक 5 मार्च 2019 पासून बेमुदत संप पुकारला आहे या संपात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील १०० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचे कॉलेजचे युनिट प्रमुख श्री. तानाजी खरात यांनी सांगितले.

राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या अश्वासित प्रगती योजना रद्द करण्याच्या निर्णयामुळे कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच त्याचा सातव्या वेतन आयोगावर ही परिणाम होणार आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे. सरकारने दिनांक ७.१२.२०१८१६.२.२०१९ या अन्यायकारक शासनादेश त्वरीत रद्द करावा ही सर्व कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालयातील कार्यालयीन कामकाज विस्कळीत झाल्याचे दिसून आले. तसेच सदर संपाचा विद्यार्थ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘रोहन’चा वाढदिवस ठरला आरोग्यदायी ; प्रतिबंधित क्षेत्रात केली अशी मदत

मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रतिबंधित क्षेत्रात आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॕथीक गोळ्यांचे मोफत वाटप केल्याने मुलगा रोहन…

8 mins ago

Morning Update : 4 पुरुष तर 3 महिला बाधित ; 1 मृत

MH13 NEWS Network  आज सोमवारी सकाळी  7 बाधित रुग्णांची वाढ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली…

7 hours ago

सोलापुरात नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण ; 5 जणांचा मृत्यू

आज प्राप्त झालेले एकूण अहवाल 120 असून निगेटिव्ह अहवाल 102 आहेत. पॉझिटिव्ह अहवाल 18 आढळून…

20 hours ago

सध्या 19 हॉस्पिटल ; म. फुले जनआरोग्य योजनेत सहभागी व्हावे.!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप कुमार ढेले यांचे आवाहन सोलापूर दि. 24 - सोलापूर शहर आणि…

21 hours ago

Live : संकटात ‘राजकारणा’पेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्वाचे- मुख्यमंत्री ठाकरे

लॉकडाऊन शिथिल करतांना विविध क्षेत्रांना गती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दिनांक २४: संकटाच्या काळात राजकारण न…

24 hours ago

मोठा निर्णय : राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

MH13 NEWS Network  मुंबई, दि. २४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य…

24 hours ago