‘आशा’च्या मानधन वाढीच्या शासन निर्णयासाठी 9 सप्टेंबर रोजी जेलभरो !

0
41

सोलापूर प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेटवर कृती समिती च्या वतीने गेल्या पाच दिवसापासून चालू असलेल्या आशांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय तातडीने जाहीर करा,यासाठी धरणे आंदोलन जिल्हा सचिवा पुष्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत.

यावेळी कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा.सलीम पटेल यांनी बोलताना म्हणाले की, गेल्या पाच दिवसापासून आंदोलन सुरू आहे,आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा झाली, बैठक झाली,तरीही सरकार आणि प्रशासन याबाबत दक्ष व गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे,म्हणून कृती समितीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतलेले असून सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करून सरकार चा निषेध केला जाणार आहे. तसेच, मानधन वाढीचा शासन निर्णय जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

यावेळी आशांच्या आंदोलनाला महाराष्ट्र इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन च्या वतीने प्रवीण माने यांनी पाठींबा दिला.
या वेळी अनिल वासम,पुष्पा पाटील यांच्या सह सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here