अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई – उपमुख्यमंत्री

MH 13 News Network

बारामती,दि.11 : बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. शहर परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत त्यांनी कामाचा आढावा घेतला.

या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावित सेवा रस्ता , बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतम बाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढविण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहाणी केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. विकासकामे करताना रस्त्यांचे सुशोभीकरण करणे, सेवा रस्त्यालागत झाडे लावण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. शासकीय जागांमध्ये असणारी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच अवैध वाळू उपसा तसेच अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस विभागाला दिले.

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

1 hour ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago