Categories: राजकीय

थेट संवाद : पथनाट्यातून महेश कोठेंच्या विकास कामाचा जागर

एकीकडे सध्या सोशल मीडिया च्या जमान्यात हायटेक प्रचार यंत्रणा वापरली जात असताना कोठे यांनी मात्र कलाकारांच्या कलागुणांना वाव देत पथनाट्याचा देखील आपल्या प्रचार यंत्रणेत समावेश करून ”जुने ते सोने आणि नव्याची कास” याचा सुंदर मेळ घातला आहे. त्यामुळे शहर मध्य मतदार संघात अण्णाच्या प्रचार यंत्रणेची देखील मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात चाय पे चर्चा होऊ लागली आहे. ”पथनाट्याचा विषय आणि आशय खोल आहे. कोठेंचे कार्य अनमोल आहे” अशा चर्चा परिसरात रंगताना दिसत आहेत.

महेश आण्णा भारी, त्यांचे काम भारी, त्यांची काम करण्याची पद्धत तर लईच भारी असा सूर सध्या शहर मध्य मतदारसंघातून उमटत आहे. त्याचे कारण म्हणजे महेश कोठे यांनी प्रचारासाठी वापरलेले वेगळे तंत्र होय. ‘नेतृत्व दमदार कोठेच आमदार’ या आशयावरील पथनट्यातून कोठे यांनी आजवर केलेल्या विकासकामाचा जागर जणू ही कलाकार मंडळी घालताहेत.

महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरत असतात. शहर मध्यचे अपक्ष उमेदवार महेश आण्णा कोठे यांनी पथनाट्याच्या माध्यमातुन जनसामान्यांपर्यंत त्यांची कामे वेगळ्या शैलीत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
राजा प्रधान असो अथवा घरगुती संवाद असो की मग कट्ट्यावर रंगणाऱ्या चर्चा असो या चर्चांमधुन निघणारा सूरच या पथनाट्यात दाखविला जात आहे.पथनाट्याचा संघ शहर मध्य या मतदारसंघात जाउन जनसामान्यांपर्यंत महेश कोठे यांनी केलेले समाजकार्य, त्यांच्याकडे असलेले विकासाचे व्हिजन जनतेपर्यंत पोहचवत आहे. कोठे समर्थकांच्या या अभिनव आशा पथनाट्यांना मिळणारा प्रतिसाद देखील अभुतपुर्व असा आहे.
त्यामुळे लोक आवर्जून पथनाट्य पाहून दाद देत आहेत.

अक्षय कट्टी लिखित, गणेश राशिनकर दिग्दर्शित ‘नेतृत्व दमदार, कोठेच आमदार’ या पथनाट्यात तिलोत्तमा मानकर,सतीश अंजिखाने,ओंकार कालेकर,व्यंकटेश क्यातारी,पवन आहेरकर,अक्षय हरेल हे कलावंत दिवसरात्र मेहनत घेऊन जनसामान्यांपर्यंत विषय पोहोचवत आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘रोहन’चा वाढदिवस ठरला आरोग्यदायी ; प्रतिबंधित क्षेत्रात केली अशी मदत

मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रतिबंधित क्षेत्रात आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॕथीक गोळ्यांचे मोफत वाटप केल्याने मुलगा रोहन…

59 mins ago

Morning Update : 4 पुरुष तर 3 महिला बाधित ; 1 मृत

MH13 NEWS Network  आज सोमवारी सकाळी  7 बाधित रुग्णांची वाढ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली…

8 hours ago

सोलापुरात नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण ; 5 जणांचा मृत्यू

आज प्राप्त झालेले एकूण अहवाल 120 असून निगेटिव्ह अहवाल 102 आहेत. पॉझिटिव्ह अहवाल 18 आढळून…

20 hours ago

सध्या 19 हॉस्पिटल ; म. फुले जनआरोग्य योजनेत सहभागी व्हावे.!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप कुमार ढेले यांचे आवाहन सोलापूर दि. 24 - सोलापूर शहर आणि…

22 hours ago

Live : संकटात ‘राजकारणा’पेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्वाचे- मुख्यमंत्री ठाकरे

लॉकडाऊन शिथिल करतांना विविध क्षेत्रांना गती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दिनांक २४: संकटाच्या काळात राजकारण न…

1 day ago

मोठा निर्णय : राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

MH13 NEWS Network  मुंबई, दि. २४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य…

1 day ago