जिल्ह्यात मतदानाच्या दिवशीचे सर्व आठवडे बाजार, यात्रा बंदचे आदेश

सोलापूर दि. 18 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019  चा विहीत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दिनांक 21 सप्टेंबर 2019  पासन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील प्राप्त निर्देशानुसार मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 14 ऑक्टोबर 2019 अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान आणि मतमोजणी दिनांकाचे दिवशी तालुक्यातील / गावातील भरणारे आठवडे बाजार/ बाजार जत्रा बंद ठेवण्यास अथवा पुढे ढकलण्यास हरकत नसलेबाबत कळविले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील मतदार संघाचे मतदान दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे व यास अनुसरुन सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांचेकडून प्राप्त अहवालानुसार मतदानादिवशी खालील तक्त्यात नमुद गावात आठवडा बाजार भरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम,कलम 37 (3) अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणक-2019 च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखणेसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानादिवशी सोलापूर जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) खालील गावांचे आठवडा बाजार भरविण्यास मनाई करणेत येत आहे, असे आदेश  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

तालुका गावाचे नांव मतदार संघाचा तपशील – दक्षिण सोलापूर,251 विधानसभा मतदार संघ –टाकळी, कणबस, बार्शी 246 विधानसभा मतदार संघ- मालवंडी, सुर्डी, गौडगाव, भालगाव, अक्कलकोट 250 विधानसभा मतदार संघ -अक्कलकोट शहर पंढरपूर 252 विधानसभा मतदार संघ – राझणी,  करकंब, फुलचिंचोली, मंगळवेढा 252 पंढरपूर –मंगळवेढा विधानसभा मतदार संघ- सलगर बु, मंगळवेढा, सांगोला 253 विधानसभा मतदार संघ- लक्ष्मीनगर, घेरडी, जुनोनी, माळशिरस 254 विधानसभा मतदार संघ- अकलुज, कण्हेर, मोहोळ 247 विधानसभा मतदार संघ –कामती बु., नरखेड पेनुर, आष्टी, उत्तर सोलापूर 247 मोहोळ विधानसभा मतदार संघ- नान्नज, करमाळा 244 विधानसभा मतदार संघ- जेऊर, साडे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

देवदूत काळाच्या पडद्याआड; डॉ.नेने यांचे निधन

MH13 NEWS NETWORK - बार्शीतील प्रख्यात डॉ. भगवान नेने यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे…

9 hours ago

अन् …मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आदेश..ही खुर्ची तुमची!

MH13 NEWS NETWORK: प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

10 hours ago

ग्लोबल व्हिलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3D सिनेमाचा अनुभव

MH13 NEWS NETWORK :  कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, बोरामणी येथील…

1 day ago

दोघा बाईक चोरट्याकडून ८ वाहने हस्तगत ; वेळापूर पोलिसांची कारवाई

MH13NEWS Network वेळापुर पोलिसांनी तिघा मोटरसायकल चोरांना पकडत त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केले. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे…

2 days ago

‘या’गावाच्या माजी सरपंच ‘पती-पत्नी’ची लेक ठरली पहिली महिला चार्टड अकौंटंट!

लक्ष्मण राऊत, माढा प्रतिनिधी माढ्यातील शेतकरी कुटुंबातील  माजी सरपंच राजेंद्र राऊत व सुनिता राऊत यांची लेक  कु.ज्योती राऊत हिने सी…

2 days ago

कौतुकास्पद : माढ्यातील युवकांच्या लघुपटाची थेट लंडन फेस्टीवलसाठी निवड

MH13NEWS Network माढ्या सारख्या ग्रामीण भागातील युवकांची चित्रपटसृष्टीतील क्षमता सातासमुद्रापार माढा येथील मनोज भांगे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आणि माढ्यातील…

2 days ago