धाडसाने उद्योग सुरू करून जिल्ह्याचे वैभव वाढवा – आ.सुभाष देशमुख

MH13NEWS Network
विद्यापीठाच्या उद्योजकता प्रदर्शनात आमदार देशमुख यांचे आवाहन

सोलापूर : कोणतीही गोष्ट करण्यासाठी धाडस लागते. या धाडसाच्या बळावरच युवक-युवतींनी नोकरीसाठी पुणे-मुंबईला न जाता व्यवसायाकडे वळून उद्योग उभारावे. उद्योगाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याची उत्पादकता वाढविण्याबरोबरच वैभव वाढवण्याचे कार्य करावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

शनिवारी, संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित उद्योजकता शिबिर व प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, इनक्युबेशन सेंटर मुंबईचे उमेश बलवाणी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, संगमेश्वर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शोभा राजमान्य, विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरचे डॉ. अजित माणिकशेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी डॉ. रश्मी दातार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. या प्रदर्शनात एकूण 50 नव उद्योजकांनी स्टॉल मांडल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार देशमुख म्हणाले की, उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात मुली व महिलांची भूमिकाही महत्त्वाची आहे. आज अनेकजण केवळ लग्नासाठी नोकरीच्या मागे लागतात. त्यामुळे त्याचा परिणाम उद्योगावर होत आहे. उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी मुली व महिलांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मोठ्या धाडसाने सोलापूर जिल्ह्यातील युवक-युवतींच्या कल्पनांना वाव देण्यासाठी व उद्योजक पिढी निर्माण करण्याकरिता खूप सुंदर प्रकारे या उद्योजकता प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याचा निश्चितच फायदा येथील विद्यार्थ्यांना व उद्योजकांना होईल, असेही देशमुख यावेळी म्हणाले. राष्ट्रीयीकृत बँकांनी नवउद्योजकांना मुद्रा तसेच विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना मदत करावे. यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनदेखील नव उद्योजकांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहील, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.
काडादी यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बलवाणी यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नव उद्योगाकडे वळण्याचे आवाहन केले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे युवक-युवतींना उद्योजकतेचे धडे देण्यासाठी प्रथमच अशा उद्योजकता शिबिराचे आयोजन केले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. वास्तविक आज कृषी, उद्योग, मेडिकल, सेवाक्षेत्रात स्वयं रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्या संधीची माहिती मिळावी व उद्योजक पिढी निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूर्वी भारतात घरोघरी उद्योग होते. नंतरच्या काळात यात खंड पडला, आता पुन्हा एकदा घरोघरी उद्योग सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रदर्शन पाहण्यासाठी दिवसभर विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनासाठी  मागास समाज सेवा मंडळाचे  सुभाष चव्हाण यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे व प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. माणिकशेटे यांनी मानले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago