Categories: Uncategorized

खासगी दवाखाने तात्काळ सुरु करा, अन्यथा कारवाई : पालकमंत्री

सोलापूर – कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी परराज्य व इतर जिल्ह्यातून सोलापूर शहर व जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी. आवश्यक ती तपासणी करूनच आपल्या गावात व घरी प्रवेश करावा. आपल्या आजूबाजूला नवीन येणाऱ्या नागरिकांची माहितीदेखील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पालकमंत्री भरणे म्हणाले, ­­‘कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी आता दक्ष राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळामध्ये परराज्यातून आणि इतर जिल्ह्यातून तसेच मुंबई, पुणे यासारख्या अनेक शहरातून अनेक नागरिक आपल्या शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. या सर्व येणाऱ्या नागरिकांची प्रशासकीय नोंद होणे आवश्यक आहे. तपासणी करूनच गावांमध्ये, घरामध्ये प्रवेश करावा. अलगीकरण कक्षाची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून व्हावी. गरज भासल्यास स्थानिक प्रशासनाने येणाऱ्या नागरिकांवर होम क्वारंन्टाइनचा शिक्का मारून त्यांना घरीच राहण्याच्या सूचना द्याव्यात’.

शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी दक्ष राहून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. आजूबाजूला येणाऱ्या नागरिकांची माहिती तात्काळ नागरिकांनी प्रशासनाला द्यावी. शासनाच्या सूचनांचे पालन सर्वांनी करावेत, असे आवाहनही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

खासगी दवाखाने तात्काळ सुरु करा, अन्यथा कारवाई : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर शहर व जिल्ह्यातील खासगी दवाखाने डॉक्टर व संस्थांनी तात्काळ सुरू कराव्यात, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार चर्चा करण्यात आलेली आहे.  मात्र दवाखाने सुरू नसल्याच्या सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासन व माझ्याकडे प्राप्त होत आहेत. शहरातील आणि जिल्ह्यातील डॉक्टर बंधू-भगिनींना मी आवाहन करतो की, खासगी दवाखाने बंद असल्यामुळे सिव्हिल रुग्णालयावर ताण वाढलेले आहे. खासगी दवाखाने सुरू झाल्यास विविध आजारावर रुग्णांना उपचार मिळेल. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येणे शक्य होईल. ‘आयएमए’कडून जिल्हा प्रशासनाला सुमारे सव्वाशे रुग्णालये सुरू असल्याची यादी सादर करण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही नागरिकांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत, त्यामुळे शहरातील सर्व खासगी डॉक्टरांना आणि ग्रामीण भागातील लोकांनी त्यांचे दवाखाने सुरू करावेत.

डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्यासाठी अडचणी असल्यास त्या जिल्हा प्रशासनाकडून सोडवल्या जातील. त्यासाठी सुरक्षाविषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. सोलापूर महानगरपालिकेने दवाखान्यांना नोटीस बजावल्या आहेत. नागरिकांचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून सदरील नोटीस बजावले आहे. आता दवाखाने सुरू केले गेले नाही तर प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर कारवाई करावे लागेल, असा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago