(वेब टीम)

शहरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी फूटपाथ उरलेच नाहीत अशी अवस्था आहे .फुटपाथवर गाळेधारकांनी वाढीव बांधकाम करून अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच उरला नाही अशी परिस्थिती आहे.
त्याच सोबत काही फेरीवाल्यांनी फुटपाथवरच आपला व्यवसाय थाटल्याने संपूर्ण फूटपाथचा त्यांनी ताबा घेतला आहे. शहरवासीयांना फूटपाथवरून चालणे मोठ्या जिकरीचे झाले आहे, ही बाब लक्षात घेऊन आज पासून 30 सप्टेंबर पर्यंत पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणमुक्त केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.
त्यांच्या या कारवाईचे शहरवासीयांकडून निश्चितच स्वागत होईल.

3 COMMENTS

  1. जेष्ठ नागरिकां साठी चालने सहज होईल. एक चांगला उपक्रम .माझा30 September birthday आहे.या उपक्रमाला पालिका आयुक्त साहेबांनी मला दिलेल birthday gift समजून या निर्णया च स्वागत करतो

  2. Sir good workyou have done from last , So many years no one has taken Like this action.So I hope it will be continuously go on.

    Thanks

  3. Sir very appreciable action for real purpose of footpaths of Solapur….Almost all are commercially used by respective Shop owners without any fear…So please do something for common public utility of footpaths ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here