Categories: राजकीय

दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी हरीष पाटील

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी होटगीचे हरीश गुरुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्यानुसार जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यांची निवड घोषित केली.
गत विधानसभा निवडणुकीत माजी तालुकाध्यक्ष गुरुनाथ मेत्रे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे .हे पद रिक्त झाले होते. या पदावर काम करण्यासाठी तालुक्यातील अनेकांनी आणि ईच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार सुशीलकुमार शिंदे यांनी या विषयात लक्ष घालून तालुक्यातील सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची एकत्र बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत सर्वांनीच तालुका अध्यक्ष निवडण्यासाठीचे सर्वाधिकार शिंदे यांना बहाल केले होते. एक माजी अध्यक्षांने एका माजी सभापतीची या पदावर वर्णी लावण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वगृही परतलेल्या डाॅ.बसवराज बगले यांनी तालुका अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे जाहीर करून हरीष पाटील यांची नियुक्ती व्हावी, यासाठी फिल्डिंग लावली होती. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून हरीश पाटील यांनाच संधी देण्याची विनंती बगले यांनी केली होती.
काँग्रेस भवनमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी हरीष पाटील यांची नियुक्ती घोषित करण्याची सूचना जिल्हाध्यक्षांना दिले. त्यानुसार ही निवड जाहीर करून हरीश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडी प्रसंगी सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके, डॉ बसवराज बगले, चंद्रकांत सुर्वे, ॲड संजय गायकवाड, महानगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे,सुरेश हसापुरे, प्रा मल्लिनाथ बिडवे,मुन्ना कुडले, राधाकृष्ण पाटील, धनेश अचलारे, यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष हरीश पाटील यांनी, आपल्यावर सोपविलेली ही जबाबदारी निपक्षपातीपणे पार पाडून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले असून फटाक्यांच्या आतषबाजीत यांचा सत्कार केला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

48 mins ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

1 hour ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

12 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

17 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

21 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

21 hours ago