सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या तिसऱ्या पर्वाची दमदार सुरुवात

MH13 NEWS NETWORK:[पालघर-योगेश चांदेकर]

पालघर- सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीचा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेले सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय, दोन वर्षांच्या यशस्वी घौडदौडीनंतर आज तिसऱ्या पर्वाच्या प्रवासात सामील झाले. दांडेकर विधी महाविद्यालयाने गेले दोन वर्षे विधी शिक्षणांसोबत विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

पालघर जिल्ह्यातील विधीशिक्षणाच्या पायाभरणीत दांडेकर विधी महाविद्यालयाची महत्त्वाची भूमिका असल्यामुळेच तिसऱ्या पर्वासाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या तुकडीच्या अनावरण कार्यक्रमात विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा यांनी आपल्या मनोगतात विधी महाविद्यालयाच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाचे अनुभव वर्णन कथन केले. तदनंतर उपस्थित विद्यार्थ्यांना विधी शाखेच्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन, विधी शाखेचे बदलते स्वरूप,विधी शाखेतील उपलब्ध संधी याबाबत विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमात प्राचार्य तसेच उपस्थित विधी शिक्षकांमार्फत दांडेकर विधी महाविद्यालयाची कार्यपद्धती, सुचना, नियमावली मार्गदर्शक तत्वे आदी बाबी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेत सोहळा उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पार पाडण्यासाठी प्रो. दिशा तिवारी, प्रो.उत्कर्षा जुन्नकर, प्रो‌.राधा मित्रा, प्रो.विनोद गुप्ता, प्रो.प्रिया तांडेल यांचे बहुमूल्य योगदान विद्यार्थ्यांना लाभले. ‘नवे पर्व, नवे उपक्रम आणि नवे चैतन्य असेच उजळत राहो’ या सुंदर विचाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

23 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago