Categories: सामाजिक

सोलापूर सोशल फाऊंडेशनची सातारा येथे बैठक

(वेब टीम)

व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या सोलापूरकरांचे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने संघटन करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाला हातभार लागण्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रम अंतर्गत सातारा येथे सोलापूरकरांची बैठक आयोजित केली होती.
सोलापूर सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक तथा राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीला सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनचे धोरण आणि उद्देश याची माहिती दिली. आज पर्यंत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने मुंबई, नवी मुंबई, खारघर, पुणे, नागपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली याठिकाणी बैठक घेण्यात आली. याच अनुषंगाने शुक्रवारी दुपारी सातारा येथे सोलापूरकरांची बैठक घेण्यात आली. विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सोलापूरकर यावेळी उपस्थित होते.
व्यापार वा विविध कामानिमित्त सोलापूर सोडून स्थलांतर झालेल्या मूळ सोलापूरकरांना एकत्रित करणे, त्यांच्या योगदानातून सोलापूरचा विकास करण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन पुढाकार घेत आहे. यावेळी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सातारा येथे वास्तव्यास असलेल्या सोलापूरकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर आपण सातारा येथे राहून आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून,आर्थिक व श्रमदान अशा योगदानाच्या रूपाने सोलापूरच्या विकासात भर घालण्याची विनंती केली. आपापल्या गावांमध्ये पाणी, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात शक्य त्या पद्धतीने हातभार लावावा. यामुळे लोकसहभागातून अनेक अशक्य कामे शक्य होतील. लोकसहभाग हेच विकासाला बाळ देते. त्यामुळे आपण सोलापूरकर या नात्याने गावच्या व जिल्ह्याच्या विकासाची भूक भागविण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
विशेषतः सातारा येथील सोलापूरकरांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले. आम्ही सोलापूरच्या विकासात मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत, असे सांगितले.

सोलापूरची सर्व उत्पादने, पर्यटन स्थळे यांचा विकास आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आमची योगदान देण्याची इच्छा त्यांनी दाखविली. सोलापूर सोशल फाऊंडेशनचे ध्येय मोठे असून भविष्यत अनेक योजना आखू, आम्ही मूळ सोलापूरकर या नात्याने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी निरंतन काम करू असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी सातारा येथील बसप्पा कोरे, श्रीधर साखरे, रवीकुमार गुरव, मल्लिकार्जुन कोरे, बाळासाहेब दलाल, माधव मेंडिगेरी, प्रशांत माने-पाटील आदी सोलापूरकर उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

22 mins ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

35 mins ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

11 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

19 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

20 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

21 hours ago