वाचा : ‘कोरोना’पासून बचावासाठी सोलापूरच्या ‘या’ दुकानदाराची ‘शक्कल’

महेश हणमे 9890  440480
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गावर केंद्र सरकार,राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला, दूध या गोष्टींच्या विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. परंतु सोलापूरमध्ये काल लोकांची मोठी झुंबड उडाली होती. त्यामुळे या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर सोलापुरातील दुकानदाराने अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे. कोरोनापासून बचावासाठी ही शक्कल नक्कीच उपयुक्त ठरेल.

सोलापुरातील कुंभारवेस भागातील महेश भिंगारे या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर सुरक्षित असे पट्टे मारले. विशिष्ठ अंतर त्या पट्ट्यांमध्ये ठेवले असून जमिनीवर त्याच्या चौकटी तयार केल्या आहेत. या चौकटी मध्येच ग्राहकांनी उभे राहायचे आहे. ग्राहकांचा नंबर आल्यानंतर सॅनीटायझरने हात स्वच्छ धुऊन मगच आवश्यक तो माल घ्यायचा अशी सिस्टीम सुरू केली आहे. त्यामुळे सोलापुरात हा कौतुकाचा विषय ठरत आहे. कुंभार वेसेतील अभिजित ट्रेडर्स या दुकानासमोर अशा प्रकारे संरक्षक चौकटी तयार केल्या आहेत.
जिल्ह्यातील अन्य दुकानदारांनी अशाप्रकारे सिस्टीम तयार करावी अशी मागणी खुद्द ग्राहक लोकसुद्धा व्यक्त करत आहेत.

सोलापुरातील या व्यापाऱ्याने केलेला अनोखा उपक्रम हा खरच कौतुकास्पद आहे .या संसर्गाला दूर ठेवण्यासाठी अशाच प्रकारचा आदर्श इतर दुकानदारांनी घ्यावा.
अतिश बनसोडे
सामाजिक कार्यकर्ता

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

14 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago