सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द…

प्रामुख्याने सोलापूरकरांसाठी ही महत्त्वाची बातमी असून रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार मध्य रेल्वेतील दौंड – पुणे सेक्शनमधील दौंड- पाटस स्थानक दरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाईन येथे अप्रोच रोड कनेक्ट करण्यासाठी 7 मार्चला साडे सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे .त्यामुळे शनिवारी धावणारी सोलापुर-पुणे इंटरसिटी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मागील 10- 11 महिन्यापासून दुहेरीकरण,भुयारी मार्ग,रूळ दुरुस्ती यासह अनेक कामांचा अडथळ्यांमुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग परावर्तीत करण्यात आले. आता 7 मार्चला दौंड – पाटस दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक असल्याने पुणे-दौंड पॅसेंजर रद्द करण्यात आली असून पुणे – सोलापूर एक्सप्रेस आणि सोलापुर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आले आहे बारामती – पुणे ही गाडी नवीन स्थानकापर्यंत धावणार असून ती गाडी दौंड – पुणे दरम्यान धावणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच पुणे – अंजनी एक्सप्रेस दौंड कॉर्ड लाईनमार्गे धावणार आहे उद्या गुरुवारी जम्मूतावी – पुणे झेलम एक्सप्रेस चा मार्ग बदलण्यात आला असून ती गाडी व्हायादौंड लाईन मार्गे धावणार आहे. सहा मार्चला हजरत निजामुद्दीन वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेस त्याच मार्गाने पुढे जाणार आहे. तर बेंगलोर- मुंबई उद्यान एक्सप्रेस दौंड स्थानकावरून व्हाया दौंड कॉर्ड लाईनमार्गे धावेल. 7 मार्चला मुंबई – बेंगलोर उद्यान एक्सप्रेस पाटस स्थानकावरून पुणे दौंड कॉर्ड लाईन मार्गे धावणार आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago