Categories: Uncategorized

1 जुलैपासून सोलापूर-कोल्हापूर रेल्वे सुपरफास्ट होणार

सध्या सोलापुरातून सोलापूर-कोल्हापूर रेल्वे गाडी (गाडी क्रमांक 11051) दररोज रात्री 11.35 वाजता सुटते व कोल्हापूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.20 वाजता पोहोचते. तर कोल्हापुरातून ही गाडी (गाडी क्रमांक 11052) दररोज रात्री 11.35 वाजता सुटून सोलापूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 7.40 वाजता पोहोचते. या गाडीला कुर्डूवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, ढाळगाव, कवठेमहांकाळ, मिरज जंक्शन या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. सध्या ही रेल्वेगाडी संथगतीने धावते.

सुधारित निर्णयानुसार सुमारे दीड तासाच्या वेळेची बचत होणार आहे.

1 जुलैपासून ही गाडी सुपरफास्ट होणार असल्याने सोलापुरातून ही गाडी 22133 या नव्या क्रमांकासह रात्री 11.50 वाजता सुटून कोल्हापूर येथे दुसर्‍या दिवशी पहाटे 5.30 पोहोचणार आहे. तर कोल्हापुरातून ही गाडी 22134 या नव्या क्रमांकासह रात्री 11.30 वाजता सुटून सोलापूर येथे दुसर्‍या दिवशी पहाटे 5.10 वाजता पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरला जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार असून वेळेत बचत होणार आहे.  सुधारित निर्णयानुसार सुमारे दीड तासाच्या वेळेची बचत होणार आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago