‘फेस्ट’ने सोलापूर जिल्ह्याच्या श्रीमंतीचे देशभरात दर्शन घडवलं ;सहकारमंत्री देशमुख

By-MH13 NEWS,वेब/टीम

सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंना सोलापूर बाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी मुंबईत आयोजित केलेल्या तीन दिवसीय “सोलापूर फेस्ट” 2019 ला 50 हजाराहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली. सोलापूरच्या वस्तू खरेदी करून नवी मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोलापूरच्या या संस्कृतीचे देशभरात दर्शन घडविणारा असल्याच्या भावना सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केल्या.

पुण्यानंतर सोलापूर फेस्टचे आयोजन नवी मुंबई खारघर येथे करण्यात आले होते. 3 फेब्रुवारी रोजी या फेस्टच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय तसेच अनेक मान्यवर उपस्थिती होते.
यावेळी बोलताना, सोलापूरची संस्कृतीला मोठी परंपरा आहे. सोलापूरच्या खाद्य पदार्थांची चव, वस्तूंची खरेदी करताना मुंबईकर आनंदी झाले. आम्हाला नावीन्यपूर्णता पहावयास मिळाली. लवकरच ठाणे येथे सोलापूर फेस्टच्या आयोजन करा, त्यास आम्ही हवे ते सहकार्य करू असे मनोगत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.


सोलापूरच्या परंपरा, खाद्य संस्कृती, वस्तूंना प्रचंड मागणी वाढत आहे. त्यामुळे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान सोलापूरची श्रीमंती दाखविण्याचे काम सोलापूर सोशल फाउंडेशन द्वारे केले.या फेस्टच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याची संस्कृती, श्रीमंती नवी मुंबईकरांना दाखविण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन, कृषी, व्यापार, उद्योग, दळण- वळण, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वैविध्यपूर्ण गोष्टीची माहिती विविध माध्यमातून दाखविण्यात आली. या वैशिष्ट्यांचा प्रचार प्रसार करण्याची गरज ओळखून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हा महोत्सव भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र व देशातील काही भागात करण्याची घोषणा केली. नवी मुंबईत आयोजित केलेल्या या उपक्रमाने एकूणच सोलापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे. महिला बचत गटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली आहे.
नोव्हेंबर 2018 मध्ये पुणे येथील पंडित फार्म मध्ये सोलापूर फेस्ट आयोजित केले होते.

नवी मुंबईत मिळालेल्या उदंड प्रतिसादाने मूळचे सोलापूरकर भारावून गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादनांचे ब्रॅडींग करण्यात आले. विशेषतः नवी मुंबईतील सोलापूर फेस्ट मधे ऑथर्स गॅलरीच्या माध्यमातून सोलापुर जिल्ह्यातील लेखकांची पुस्तके मुंबईकरांना पाहता आली. सोलापूरची लेखकांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी आली.

नवी मुंबईकरांनी सोलापूर फेस्टच्या समारोपाच्या तिसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 50 हजाराहून अधिक जणांनी सोलापूरच्या संस्कृतीचा अनुभव घेतला. अखेरच्या दिवशी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोलापूरची अध्यात्मिक, सांस्कृतिक ओळख करून दिली. संध्याकाळी सोलापूरच्या चटकदार खाद्य पदार्थांवर ताव मारून विविध वस्तूंची खरेदीही केली. सुमारे 5 कोटींची उलाढाल या फेस्टच्या माध्यमातून झाली. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सोलापूर सोशल फाऊंडेशनची माहिती घेतली.

या फेस्ट मध्ये साक्षात पांडुरंगाचे, तुळजापूरच्या तुळजाभवानी माता, स्वामी समर्थ, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदीराची उभारणी केली होती. या मंदिर जवळ जाऊन दर्शन करण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु,…

7 hours ago

सोलापूर- पुणे हायवेवर विचित्र अपघात : तिघांचा मृत्यू, चौघे जखमी

BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माढा तालुक्‍यातील अरण येथे रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अपघात झाला. या…

8 hours ago

चहावाला पंतप्रधान होतो तर चहापानावर बहिष्कार का? – मुख्यमंत्री ठाकरे. वाचा ठाकरेशैली…

MH13 NEWS Network: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला कोपरखळी मारली. पत्रकार परिषदेतील…

9 hours ago

अजून किती बळी ? मार्केटयार्ड सर्व्हिस रोडवर जड वाहनाचं पार्किंग

BY MH13 NEWS NETWORK :  सोलापूर मार्केट यार्ड मधील सर्व मोठी वाहने रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर 24 तास उभे करत असल्याचे दिसून…

10 hours ago

राजन पाटील यांच्यावर अधिवेशनानंतर येणार नवी जबाबदारी!

MH13 NEWS Network: विधानसभा निवडणुक रणधुमाळीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये…

11 hours ago

पुरुष गट राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा…

BY MH13 NEWS NETWORK : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित वरिष्ठ गट पुरूष आंतर जिल्हा स्पर्धा या दी. १२ ते…

12 hours ago