सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचा महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा!

0
533

BY-MH13News,Network

गेल्या 40 वर्षांपासून कै.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून प्रयत्न केले. परंतु त्यावेळच्या सरकारने या मागणीला योग्य न्याय दिले नाही.तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे कै.अण्णासाहेब पाटील यांनी आत्मबलिदान दिले. त्यामुळे मराठा समाजाच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आले.त्यानंतर 2014 साली खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी शिवशाहू यात्रेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले. त्याचा समारोप 25 जानेवारी 2014 साली सोलापूर येथील चार पुतळा चौकात घेण्यात आला.

त्यानंतर मराठा समाजाची एकूण महाराष्ट्रभर 58 मूक मोर्चे निघाले. या आंदोलनात एकूण 42 युवकांनी आत्मबलिदान दिले. मराठा समाजाच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, माजी आमदार दिलीप माने, यांनी वेळोवेळी या आंदोलनास पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या महाराष्ट्रभर निघणाऱ्या मोर्चास यावरील मान्यवरांनी वेळोवेळी सहकार्य केले व भाजप शिवसेना युती सरकारने कायदेशीर आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे त्यांचे ऋण फेडण्यासाठी सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांना मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्याचे श्रीकांत घाडगे व प्रताप चव्हाण यांनी जाहीर केले.
भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना दिलेल्या जाहीर पाठिंब्याचे पत्र सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री विजय देशमुख यांनी मराठा समाजाचे सरकारच्या वतीने आभार मानले. यापुढे मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी बांधील राहीन असे आश्वासन दिले.
याप्रसंगी शशी थोरात, जितेंद्र पवार,मिलिंद भोसले, शेखर फड, सुनील शेळके, लहू गायकवाड, दत्ता पवार, योगेश पवार, दिनकर जगदाळे, सुधीर चौगुले, नाना भोसले, विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here