उपमहापौर राजेश काळेंना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक ; उपमहापौरपद धोक्यात

MH13 NEWS Network

सांगवी येथील एक फ्लॅट चार ते पाच जणांना विकल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून अटक करण्यात आली आहे. फसवणूक  प्रकार 2018 -2019 या कालावधीतील आहे .

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असून यापूर्वीच काही जणांना अटक झाली आहे .सांगवी पोलीस उपमहापौर काळे यांना ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी दिनांक 30 मे रोजी सोलापूर येथे विजापूर नाका पोलीस ठाण्यात आले होते.सांगवी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काळे यांना ताब्यात घेतले.
रात्री उशिरापर्यंत त्यांच्या अटकेची कारवाई सुरू होती.

सांगवी परिसरातील फ्लॅट राजेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार ते पाच जणांना विकल्याचे प्रकरण समोर आले होते. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फ्लॅट खरेदी विक्री मध्ये सुमारे वीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी व सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

उपमहापौर पदावर येणार गंडांतर…

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने आणि अटक झाल्याने भाजपाचे राजेश काळे यांचे उपमहापौरपद धोक्यात आले आहे.महापौर अथवा उपमहापौर या पदावर असलेल्या व्यक्तीने आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी केलेले गैरवर्तन किंवा कोणत्याही अशोभनीय वर्तनाबद्दल दोषी असल्याचे आढळून आल्यास राज्यशासन त्यांचे सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी रद्द करू शकते.

अशा पालिका सदस्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर ही कारवाई केली जाते. आदेशाच्या दिनांकापासून सहा वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास बंदी घातली जाते.कोणताही महापालिका सदस्य कर्तव्य बजावत असताना गैरवर्तन बद्दल दोषी ठरला तर राज्यशासन स्वतःहून किंवा महापालिकेच्या शिफारशीवरून त्या सदस्याला पदावरून दूर करू शकते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago