प्रा. नयना काशीद (भोसले) यांचे स्मृतिगंधा पुस्तक प्रकाशित

MH13NEWS Network

कै. शकुंतला अंकुशराव भोसले यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त प्रा. नयना भोसले यांच्या स्मृतिगंधा पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. तुळजापुरातल्या मसला (खु.) येथे या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन आणि लोकार्पण पार पडले. प्रा. नयना भोसले ह्या सोलापुरातील मातोश्री गंगुबाई केकडे ज्युनिअर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. व्यक्तीच्या आयुष्यात आई वडीलांचे काय स्थान असते. तसेच त्यांच्या जाण्यानंतर निर्माण होणार पोकळी याचे भावविश्व या पुस्तकातून रेखाटण्याचे कार्य प्रा. नयना काशिद यांनी केले आहे. यंत्राच्या युगात वावरताना माणसाचे मन देखील यंत्रमय झाले आहे. मानवी संवेदना संपत चालल्या असून आयुष्यात आई-वडीलांचे महत्व कमी होताना पाहायला मिळतेय. त्यामुळे आजच्या तरुण पीढीला भावणारे प्रसंग लिहित पालकांचे महत्व प्रा. नयना काशीद यांनी आपल्या पुस्तकातून मांडले आहे.

या पुस्तक प्रकाशनाला संत रविदास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आगवाणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. पारंपारिक पद्धतीने हा कार्यक्रम न होता, आईचे संस्कार पुस्तक रुपाने जींवत ठेवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी अशोक आगवाणे यांनी व्यक्त केले. आई-वडीलांच्या संस्काराचा आदर केला तर वृद्धाश्राम हे समाजातून कायमचे नष्ट होतील असे वक्तव्य जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या व कृषी अधिकारी सारिकाताई आंबुरे यांनी केले. या कार्यक्रमास मसला खुर्दच्या सरपंच प्रफुल्लता नरवडे, मनोज ठोबके, डॉ. अंकुशराव भोसले, बाळासाहेब निंबाळकर, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत नरवडे, नितीन काशीद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या कार्य़क्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत भोसले यांनी केले तर आभार योगीता शिंदे यांनी मानले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

42 mins ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

1 hour ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

12 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

17 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

21 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

21 hours ago