परिवहन कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार जोरात; वेतनासह बोनसही मिळणार

महापालिका परिवहन सभापती मस्के यांची माहिती

0
7

(वेब/टीम)

महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी काळी होणार नसून वेतनाबरोबरच त्यांना बोनस देण्यात येणार आहे. दरम्यान, 100 नवीन बसेस खरेदीचा निर्णय परिवहन समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत एकमताने घेण्यात आला आहे.
सोलापूर महापालिका परिवहन समितीची सभा मंगळवारी सायंकाळी सभापती तुकाराम मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. महापालिका परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी आता नवीन बसेस खरेदी ची आवश्यकता आहे. त्यामुळे 100 नवीन बसेस खरेदीचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला. याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे अधिकार व्यवस्थापक अशोक मल्लाव यांना देण्यात आला आहे.
सोलापूर शहरात सुमारे परिवहनचे 63 बस स्टॉप आहेत. त्या ठिकाणी कॅन्टीन व झेरॉक्स चे दुकान साठी जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. क्यू शेडचा 40 टक्के भाग भाडेकराराने देण्यात येत आहे. यामुळे परिवहनच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
परिवहन उपक्रमा कडील कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी काळी न होता ती गोड होणार आहे. यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच बोनसही देण्यात येणार आहे. अशी माहिती तुकाराम मस्के यांनी दिली.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. परिवहन उपक्रम हाही महापालिकेचा एक घटक आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मिळाल्यास परिवनकडीलही कर्मचाऱ्यांना देण्याचा आमचाही आग्रह राहणार आहे असे परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी स्पष्ट केले.

तर सिंहगड च्या त्या बसेस परिवहन कडे वर्ग करण्यात येतील
महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सतरा बसेस जप्त करण्यात आले आहेत. या बसचा लिलाव करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नियमानुसार चर्चेअंती महापालिका आयुक्त यांनी निर्णय घेतल्यास सिंहगड च्या त्या बसेस महापालिका परिवहन उपक्रमाकडे वर्ग करता येऊ शकते. महापालिका आयुक्त व संबंधित संस्थेच्या चर्चेतून तसे ठरल्यास परिवहन उपक्रम आला त्या बसेसची मदत होणार आहे. तसे झाले तर या बसेस सोलापुरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यां साठी उपयोगात आणता येतील असेही परिवहन व्यवस्थापक मल्लाव यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here