श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने रक्तदानाने केला महोत्सवाचा शुभारंभ.!

By-MH13 NEWS,वेब/टीम

श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या महोत्सवाचे उद्घाटन मंदिरातील यात्रा निवासस्थानी रक्तदान शिबिराने मोठ्या उत्साहात झाले.

महापौर शोभा बनशेट्टी व देवस्थान कमिटी चे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला.यावेळी फाऊंडेशनचे निमंत्रक वीरभद्र बसवंती कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, अध्यक्ष आनंद मुस्तारे, सचिव विकास कस्तुरे,शिवयोगी शास्त्री, बसवराज शास्त्री, मल्लिनाथ राचेट्टी,वीरशैव व्हीजनचे राजकुमार बुरकुले, सकलेश बाभूळगावकर,लहू गायकवाड, सिद्धराम कटारे, रवी बिद्री आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी महापौर म्हणाल्या की, ‘सोलापूर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. सोलापूर हे स्मार्ट सोलापूर च्या दिशेने वाटचाल करीत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून केलेल्या रक्तदान शिबिरमुळे व रक्तदात्यास हेल्मेट दिल्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील. तसेच सोलापूरकरांची सांस्कृतिक गरज ओळखुन फाउंडेशनने केलेल्या या उपक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष काडादी यांनी सांगितले की,’ महोत्सवाच्या पहिल्याच वर्षी लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामुळे सोलापुरात सांस्कृतिक पर्यटन वाढेल.आणि जर पर्यटन वाढले तर शहराचा विकास नक्कीच होईल. सिद्धेश्वर सोशल फौंडेशनच्या उपक्रमात भविष्यात नक्कीच मदत करू’ असे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे ,श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सिद्धेश्वर मंदिरात बंदोबस्तात असलेल्या जेलरोड पोलीस पोलीस स्टेशनच्या महिला हेड कॉन्स्टेबल संगिता चंद्रशेखर यांनी रक्तदान करून योगदान दिले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु,…

7 hours ago

सोलापूर- पुणे हायवेवर विचित्र अपघात : तिघांचा मृत्यू, चौघे जखमी

BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माढा तालुक्‍यातील अरण येथे रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अपघात झाला. या…

8 hours ago

चहावाला पंतप्रधान होतो तर चहापानावर बहिष्कार का? – मुख्यमंत्री ठाकरे. वाचा ठाकरेशैली…

MH13 NEWS Network: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला कोपरखळी मारली. पत्रकार परिषदेतील…

9 hours ago

अजून किती बळी ? मार्केटयार्ड सर्व्हिस रोडवर जड वाहनाचं पार्किंग

BY MH13 NEWS NETWORK :  सोलापूर मार्केट यार्ड मधील सर्व मोठी वाहने रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर 24 तास उभे करत असल्याचे दिसून…

9 hours ago

राजन पाटील यांच्यावर अधिवेशनानंतर येणार नवी जबाबदारी!

MH13 NEWS Network: विधानसभा निवडणुक रणधुमाळीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये…

11 hours ago

पुरुष गट राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा…

BY MH13 NEWS NETWORK : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित वरिष्ठ गट पुरूष आंतर जिल्हा स्पर्धा या दी. १२ ते…

12 hours ago