श्रीसिद्धरामेश्वरांकडे साकडे |कोरोनाचे संकट दूर होऊ दे ; सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे :पालकमंत्री भरणे

सोलापूर,दि.13: वर्षभरापासून कोरोनाची जागतिक महामारी सुरू आहे. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा सोलापूरला गतवैभव प्राप्त होऊ दे, असे साकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री सिद्धरामेश्वरांकडे घातले.

आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. भरणे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार

घालण्यात आलेल्या अटीनुसार पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य, मानकरी उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर यात्रा

श्री. भरणे यांनी पालखीतील मुर्तींचे दर्शन घेतले. अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावून सिद्धेश्वर मंदिरातही दर्शन घेतले.

श्री. भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी होऊ दे, असा आशीर्वाद मागितला आहे. अजून कोरोनाचे संकट संपले नाही. लसीकरण मोहीम सुरू होईल, लस दिली तरीही नागरिकांनी गाफिल न राहता सर्वांनी कुटुंबासह स्वत:ची काळजी घ्यावी. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्वांना लस दिली जाणार आहे. पुढचे दोन-तीन महिने कठिण आहेत, शासकीय नियमाचे पालन केले तर कोरोना हद्दपार होईल.

देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील

कोरोनामुळे प्रशासनाने मानकरी आणि काही भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे इतर राज्यासह, जिल्ह्यातील भक्तांना उपस्थित राहता आले नाही, दर्शन करता आले नाही. पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक यात्रा साजरी करूया. सिद्धरामेश्वर मंदिर देवस्थानच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.

पंच कमिटीतर्फे सन्मान

पालकमंत्री श्री. भरणे यांचा पंच कमिटीतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मिलिंद थोबडे, पुष्कराज काडादी यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

16 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

21 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago