महापालिकेच्या नूतन सभागृहनेतेपदी श्रीनिवास करली

संजय कोळींचा कार्यकाळ संपल्याने झाली नूतन नेत्याची निवड

0
204

महेश हणमे, MH13News

सोलापूर महापालिकेच्या नूतन सभागृह नेतेपदी आक्रमक व अभ्यासू नगरसेवक श्रीनिवास करली यांची आज शुक्रवारी निवड करण्यात आली. करली हे सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे समर्थक आहेत.

नूतन सभागृह नेतेपदी कोण याबद्दल महापालिका वर्तुळात वेगवेगळे आडाखे बांधले जात होते.पण यात श्रीनिवास करली यांनी बाजी मारली. संजय कोळी यांचा कालावधी संपल्याने नव्या नेत्याची निवड करण्यात आली. शहर सरचिटणीस शशिकांत थोरात यांनी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिलेल्या पत्रानुसार करली यांच्या नावाची घोषणा केली. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तूल, मावळते सभागृहनेते संजय कोळी, भाजयुमोच्या शहराध्यक्ष वृषाली चालुक्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करली यांचा सत्कार करण्यात आला. करली यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय सभागृहात निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नगरसचिव कार्यालयातर्फे सत्कार

याच वेळी नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन सभागृहनेते करली यांचा सत्कार करण्यात आला. करली यांच्या समर्थकांनी या निवडी बद्दल जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here