नंदीध्वजाचे पूजन करून श्रीसिद्धेश्वर यात्रेस सुरुवात ; यंदा प्रथमच भाविकाविना यात्रा…

MH13 News Network

सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वर यात्रेस आज भक्तीभावानं सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे असणारा हलग्या, वाजंत्रीचा निनाद मात्र यंदा नाही. मात्र एकदा बोलाभक्त लिंग हर्र बोला हर्र चा जयजयकार सुरु होता. दर्शनासाठी यंदा भाविकांची रीघ नाही. तरीही पण 50 मानकरी आणि पुजारी,सेवेकरी, ट्रस्टी यांना पूजा विधी पार पाडली.

सातही मानाचे नंदीध्वज आहे त्याच ठिकाणी विधिवत पूजा करून ठेवण्यात आले आहेत. आज सकाळी 10:30 च्या सुमारास बाळीवेस येथील हिरेहब्बू मठातून पूजा विधी झाल्यानंतर नंदीध्वज तिथेच ठेवून मानकरी पालखी ठेवून रथातून सिद्धरामेश्वर मंदिराकडे रवाना झाले.तिथे पूजा विधी झाल्यानंतर 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मानकरी रवाना झाले.

यंदाही मुस्लिम बांधवांनी केली पुष्पवृष्टी…

P

रथ आणि पालखीचं विजापूर वेस येथे हे मुस्लीम युवकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं. रस्त्यात अनेक ठिकाणी भाविकांनी आपल्या घरात जवळ उभारून पालखीचे दर्शन घेतलं. पोलीस प्रशासनाने कुठेही रथ आणि पालखी थांबू नये,गर्दी होऊ नये याची खबरदारी घेतली होती.

पोलीस छावणीचे स्वरूप ; कडेकोट बंदोबस्त

आज सिद्धरामेश्वर मंदिराकडे येणारे रस्ते चोहीबाजूने बॅरिकेटिंग टाकून बंद करण्यात आले आहेत. केवळ पासधारकांनाच मंदिराच्या दिशेने सोडण्यात येत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी या परिसरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून येतो.

आज सोलापुरात सिद्धरामेश्वर महायात्रेच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना लोकांची गर्दी नसली तरी घरोघरी लोक या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने विधिवत पूजा करत आहेत. घरी नेवेद्य आणि प्रसादाचे कार्यक्रम सुरू आहेत.उद्या याच पद्धतीने अक्षता सोहळ्यासाठी निघण्याआधी सातही नंदीध्वज यांचं आहे त्या ठिकाणी पूजन होईल. यानंतर वाहनातून हे नंदीध्वज संमती कट्ट्याकडे रवाना होतील. तिथे पूजन होऊन उपस्थित मानकरी अक्षता सोहळा पार पाडतील. या कार्यक्रमासाठी ही नागरिकांना सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही .अक्षता सोहळ्यानंतरही नंदीध्वज वाहनातूनच आपल्या जागी मार्गस्थ होतील.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

1 hour ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

22 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

24 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago