श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

By-MH13 NEWS,वेब/टीम

श्री सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन आयोजित सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २७ ते ३० जानेवारी दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती निमंत्रक वीरभद्रेश बसवंती यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात रविवार दि. २७ जानेवारी रोजी स. ८ ते ५ वाजेपर्यंत सिद्धेश्‍वर मंदिर येथे रक्तदान शिबिर होणार असून प्रत्येक रक्तदात्यास कृतज्ञता म्हणून हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. सोमवार २८ जानेवारी रोजी सोलापूर शहरातील विविध शाळेमधील ५ वी ते ८ वी विद्यार्थ्यांकरिता हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायं. ५ ते ८ या वेळेत शालेय समुहनृत्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी मल्हार अ‍ॅकडमी अमोल देशमुख 9922557500 यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे.
मंगळवार दि. २९ जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे मिस अ‍ॅन्ड मिसेस सोलापूर २०१९ या फॅशन शोचे आयोजन सायं. ५ ते ८ पर्यंत आहे. या स्पर्धेसाठी सनशाईन वेन्चरच्या संजीवनी गायकवाड 8793314141 यांच्याशी संपर्क करावा. तसेच बुधवार दि. ३० जानेवारी रोजी श्रमिक पत्रकार संघ व सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सिद्धेश्‍वर यात्रा उत्कृष्ट वृत्तांकन व छायाचित्र स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा व सिद्धेश्‍वर यात्रेतील प्रमुख मानकरी तसेच यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन, एम.एस.ई.बी.पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून करण्यात येणार आहे.


स्मार्ट सोलापूरात शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यात अशा सांस्कृतीक महोत्सवाने सोलापूराचे पर्यटन होण्यास नक्कीच मदत होईल, असे महोत्सव अध्यक्ष आनंद मुस्तारे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस समिती अध्यक्ष आनंद मुस्तारे, कार्याध्यक्ष विजयकुमार  हत्तुरे, उपाध्यक्ष रेवणसिद्ध बिज्जीरगी, सचिव विकास कस्तुरे, खजिनदार रवी बिंद्री, मल्लिनाथ साखरे, सुयश खानापुरे, संजीवनी गायकवाड आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

Breaking -ट्रॅव्हलर, सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

धक्कादायक मोहोळ विजापूर हायवे वरील घटना मोहोळ विजयपूर महामार्गावर येथे विजयपूर कडे व्हीआयपी सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक भीषण आग…

1 day ago

राज्यासाठी ठाकरे सरकारची पंतप्रधान मोदींकडे ही ‘मागणी’

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली, दि. 21 : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा…

2 days ago

माजखोर ‘वारिस’ तुझे 15 कोटी लोक घेऊन….

MH13NEWS Network एमआयएमचे वारिस पठाणच्या प्रतिमेला 'प्रहार'ने काळ फासलं आम्ही १५ कोटी मुस्लिम १३५ कोटी हिंदूवर भारी असल्याचे वादग्रस्त विधान…

2 days ago

‘यल्लोरु अप्पा बेडर शिवभक्त कन्नप्पा’…जयंती भक्तिभावात…

MH13NEWS Network महाशिवरात्री म्हणजेच सृष्टी दिन याच दिनी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे अख्यायिका मध्ये…

2 days ago

#शिवमय : महाशिवरात्रीनिमित्त कुडल घाटावर ‘भक्तीसंगम’

शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर फुलले सोलापूर, दि.21 फेब्रुवारी - महाशिवरात्रीनिमित्त कुडल संगम (दक्षिण सोलापूर) येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.…

2 days ago

या पुढे…राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज.!

मुंबई, दि. १७ राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून याविषयी चर्चा…

2 days ago