MH13NEWS ,Network
सामाजिक संघटना व्यक्त करताहेत संताप
संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांच्या संख्येने सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले आहे.या पार्श्वभूमीवर महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या नगरसेविका आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची ‘कॊरोना’ संदर्भात तपासणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांनी व महिला बालकल्याण सभापतींनी याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. कोरोना संदर्भात तपासणी झालीच नाही ही धक्कादायक बाब समोर आली आहे. काही वेळापूर्वी रेल्वेने सर्व नगरसेविका आणि त्यांच्यासोबत प्रवासाला गेलेले कर्मचारी हे सोलापुरात आपापल्या घरी पोहोचले आहेत.
‘परत या’ हाकेला नाही दिला ‘ओ’
अभ्यासदौरा की पंचतारांकित सहल अशा स्वरूपाचा प्रश्न समाज माध्यमावर विचारला गेला.पुणे मार्गे दिल्ली, आग्रा, अहमदाबाद, सुरत, असा हा दौरा केला गेला. विमान,लक्झरी बस, रेल्वे असा हा सर्व प्रवास होता. विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये या सर्वांचा मुक्काम असल्याने सोलापुरातील सामाजिक संघटनांनी ‘परत या परत या’ कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दृष्टीकोनातून आरोग्याची काळजी घ्या.! अशी आर्त हाक दिली होती.
विशेष म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर आणि सभागृहनेते यांनी सुद्धा अशा प्रकारचे आवाहन केले होते. पण त्याला कोणताच प्रतिसाद या महिला नगरसेवकांनी दिला नाही.
कोरोना विषाणू संदर्भात कोणतीच आरोग्य तपासणी न होता सर्व टीम सोलापुरात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी ‘त्या’ नगरसेविकांच्या,कर्मचाऱ्यांच्या आणि सोलापूरकरांच्या आरोग्याविषयी कोणती काळजी घेणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…