धक्कादायक : 29 रुग्ण एकाच दिवशी आढळले ; वाचा अधिकृत माहिती.!

MH 13 NEWS Network

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज  29    ने वाढून    182 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी सायंकाळी दिली. आज पर्यंतचा सर्वाधिक वाढलेला हा आकडा आहे. आज एकाच दिवशी इतक्या बाधितांची संख्या वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

काल बुधवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 153 होती.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.

सोलापुरात आयसोलेशन वार्डात असणाऱ्या रुग्णांपैकी आत्तापर्यंत   2775    जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली .यापैकी     2495 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात   2313  निगेटिव्ह ,तर     182 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,आज एका दिवसात सोलापुरात  126     चाचणी अहवाल आले यात अहवाल 97    निगेटिव्ह तर 29   पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये   14   पुरुष तर   15  स्त्री असून 1  स्त्रीचा मृत्यू झाला आहे.

आज आढळून आलेले नवे रुग्ण
आकाशवाणी केंद्र जवळ 12
अलकुंटे चौक 2
बापूजी नगर 4
भारतरत्न इंदीरा नगर 2
नई जिंदगी 4
रंगभवन 1
शनिवार पेठ 1
रेल्वे लाईन 1
न्यू पाच्छा पेठ 2

आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजतागायत 11 मृत्यू झाले आहेत.

आज एक महिला मृत पावली असून ती व्यक्ती न्यू.पाच्छा पेठ परिसरातील असून त्यांचे वय 48 होते.दिनांक 6 मे रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये या महिलेस दाखल करण्यात आलं होतं. 6 मे रोजी दुपारी ती मृत पावली. आत्तापर्यंत मृतांची संख्या 11 झाली आहे. यात 5 पुरूष, 6 महिला असा समावेश आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

2 hours ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago