Categories: सामाजिक

शिवजयंती :शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने महिलाश्रमात साडी वाटप

By- MH13 NEWS,वेब/टीम

सोलापुरातील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीच्या निमित्ताने आगळ्यावेगळ्या पद्धतीने शासकीय रेणुका महिला वसतिगृह सोलापूर येथील वंचित, निराधार महिलांना साडी वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची 389 जयंतीनिमित्ताने रेणुका महिला वसतिगृहातील स्नेहल माने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. या कार्यक्रमात कृष्णा थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवमुद्रा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे यांच्या हस्ते स्नेहल माने यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अतुल गडेकर, बालाजी अंबुरे यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. सोनु कांबळे, सागर कोथिंबिरे यांच्या हस्ते तेथील महिलांना साडी वाटप करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी कृष्णा थोरात यांनी महाराजांचा स्त्रियांसाठी असणारा आदर कसा होता ते सांगितले. “परस्त्री माता मानणारा एकमेव राज्यकर्ता म्हणजे राजा शिवछत्रपती. ज्या काळात शत्रू स्त्रीच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात असत त्या काळात शिवरायांनी स्त्रीवर्गाला संरक्षण दिलेले.” असे राजे शिवछत्रपती होते.

या कार्यक्रम प्रसंगी शिवमुद्रा प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश कांबळे, संतोष धाकपाडे, सोनू कांबळे, मयूर क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, गणेश कांबळे,कुणाल कोथिंबीरे, ऋषिकेश पिस्के, सागर कोथिंबीरे, बालाजी अंबुरे, अतुल गडेकर, कृष्णा थोरात, ओंकार, सौरभ सुरवसे अनिकेत सुरवसे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

17 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago