Categories: सामाजिक

शिवबसव संस्थेच्या वतीने यंदा मकरसंक्रात वंचितांसोबत साजरी

MH13 NEWS NETWORK:
सोलापूरतील श्री सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षदा सोहळा निमित्त सोलापूर शहरात दरवर्षी लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात. सोलापूरच्या पावन नगरीत अनेक सामाजिक संस्था मिळून मंदिर परिसरात गोरगरिबांना अन्नदान करतात. मकरसंक्राच्या कार्यक्रमाला फाटा देत यंदा शिवबसवच्या वतीने विजापूर रोड जवळील झोपडपट्टी परिसरात प्रसाद म्हणून मोफत जेवण वाटप करण्याचा आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आले होते. अक्षदा सोहळा संपन्न झाल्यानंतर शिवबसव सामाजिक संस्थेच्या वतीने झोपडपट्टी भागामध्ये मकरसंक्रात साजरा करण्यात आले. सोलापुरात काही भागामध्ये सण साजरा केले जात नसल्याने त्यांना मकरसंक्रातचे महत्त्व आणि सणासुदीला गोडधोड जेवण जेवता येत नाही. यामुळे अनेक गरीब भाविक यांपासून वंचित राहतात. यावर्षी संस्थेच्या वतीने ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, गरगट्टा, शेंगा चटणी, वांग्याची भाजी गरिबांना वाटप करून मकरसंक्रात साजरा करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शंकर बंडगर, अमर बिराजदार, अभिषेक काळे, महेश कासट, राहुल धुत्तरगी, रवी दहिटणे, विनोद गडगे, रेवणसिद्ध पसारे, आदित्य बंडगर आदींची उपस्थिती होती.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago