सिध्देश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी शिवानंद हिरेहब्बू यांचे निधन

0
9

सोलापूर:- येथील श्री. सिध्देश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी व श्री. मल्लीकार्जून मंदिराचे विद्यमान पुजारी श्री. शिवानंद रेवणसिध्द हिरेहब्बू वय ८५ यांचे मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. शिवानंद हिरेहब्बू हे गेल्या ४५ वर्षापासून सिध्देश्वर यात्रेत भाकणूक सांगत होते, तसेच ते सोन्नलगी सिध्देश्वर मंदिराचे ही पुजारी होते. वीरशैव समाजातील एक अध्यात्मिक व्यक्तीमत्व म्हणून परिचीत असलेल्या हिरेहब्बू यांचे वीरशैव समाजात भरीव योगदान होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री लिंगायत रुद्रभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवर व सर्व क्षेत्रातील समाजबांधव सामील झाले होते. ते राजशेखर हिरेहब्बू यांचे वडील होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here