कौतुकास्पद : माढ्यातील युवकांच्या लघुपटाची थेट लंडन फेस्टीवलसाठी निवड

MH13NEWS Network

माढ्या सारख्या ग्रामीण भागातील युवकांची चित्रपटसृष्टीतील क्षमता सातासमुद्रापार

माढा येथील मनोज भांगे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आणि माढ्यातील विक्रम शिंदे या युवकाने निर्मिती केलेल्या ‘ युफोरिया’ या लघुपटाची इंग्लंडच्या नामांकित ‘लेफ्ट ऑफ सेशन फिल्म फेस्टिवल’ इथे ‘आर्ट फिल्म्स ‘ या विभागात निवड झाली आहे. माढा सारख्या ग्रामीण भागातील तरुणांनी बनवलेली कलाकृती ही सातासमुद्रापार आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तमाम माढेकराना अत्यंत अभिमान वाटत आहे.
पाइन वूड या सुप्रसिद्ध स्टुडिओ निर्मितीसंस्थेमार्फत हा महोत्सव पार पडणार आहे.युफोरिया ची कथा ही मानवी नीतिमूल्ये अधिक गडद करणारी कथा असून ‘निसर्ग’ एक पात्र म्हणून या कथेत ठसा उमटवते.कोकणातल्या रायगड जिल्ह्यात याचे चित्रीकरण झाले असून एकूण चार दिवस शूटिंग चालली. या लघुपटात सिने अभिनेते रोहीत माने आणि सुमित पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत.युफोरियाची निर्मिती माढ्यातील विक्रम शिंदे यांनी केली असून उत्तोमोत्तम कलाकृती समाजासमोर यायलाच हव्यात असे वक्त्यव्य शिंदे यांनी केले, युफोरिया ची कथा ही प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावेल असा विश्वास ही विक्रम शिंदे यांनी व्यक्त केला,
सुप्रसिद्ध चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ याचे साऊंड डिज़ाइनर अद्वैत वाळुंजकर यांनी युफोरिया चे साऊंड आणि मिक्सिंग केले असून सर्व पोस्ट प्रोडूकशन हे पुण्यातील सुप्रसिद्ध डॉन स्टुडिओ मध्ये झाले आहे. याचे छायाचित्रण अनिकेत कुलथे यांनी केले आहे.
दारफळचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रत्नदीप बारबोले यांनी युफोरिया चे पोस्टर बनवले आहे.
मनोज भांगे यांनी यापूर्वी केलेल्या ‘लव्हाळ’ या लघुपटालाही ४० हुन अधिक पुरस्कार मिळाले असून अमेरिका, लंडन, फ्रान्स इत्यादी देशात त्याचा सन्मान झाला आहे. व्ही. शांताराम, सत्यजित रे पासून ते स्टीव्हन स्पीलबर्ग सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्ममेकर चा अभ्यास हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे मनोज भांगे यांनी सांगितले.

सध्या मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीचे काम चालू असून ग्रामीण भागातील अनेक चांगले कलाकार यात दिसतील असे विक्रम शिंदे आणि मनोज भांगे यांनी सांगितले .

ग्रामीण भागातील तरूणांमध्येही चांगली अभिनयक्षमता आहे.मात्र त्याना योग्य संधी मिळणे आवश्यक असते.आणि याचसाठी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात ग्रामीण भागातील युवक आमच्या माध्यमातून पुढे येत आहेत.तरूणांनी अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहून त्यासाठी कठोर परिश्रम घेतानाच मोठा संयम ठेवण्याची गरज आहे.भविष्यात ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन मोठे चित्रपट निर्मिती करणार आहोत.
विक्रम शिंदे
निर्माता “युफोरिया “

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago