सोलापूर शहरातील राजकारणात विशेषतः महानगरपालिकेतील राजकारणात मागील दोन दिवसापासून महेश कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारा प्रवेश याची चर्चा वेगात सुरू आहे.
आज शुक्रवारी मुंबईमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होणार होता परंतु सकाळी अकरा वाजता तो झाला नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मिटिंग झाली. त्यानंतर मोजक्या काही लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सुद्धा महेश कोठे यांचा प्रवेश झाला नाही. त्यामुळे याची चर्चा महापालिका वर्तुळात आणि शिवसेनेत रंगली होती. पण या चर्चेला आता विराम मिळाला आहे. कारण दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांचा पक्ष प्रवेश झाल्याची ची माहिती देण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री महेश कोठे यांनी सहकार्यांसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .सर्वांचे पक्षात व महाविकास आघाडीत मनःपूर्वक स्वागत… असा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…