जाणता राजा विषयावर शरद पवारांनी साताऱ्यातच दिलं ‘हे’ उत्तर

MH13 NEWS NETWORK:

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा या उपाधीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे जाहीर कार्यक्रमात बोलत होते. खटाव – माण साखर कारखान्याच्या २५१००१ व्या साखर पोत्याच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यात आले आहेत. यावेळी शरद पवारांनी जाणता राजा यावरुन उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

“मला जाणता राजा म्हणा असं मी कधीही कुणाला म्हणालो नाही. जाणता राजा या शब्दाचा सर्वात प्रथम उल्लेख रामदास स्वामींनी केला होता. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. माँसाहेब जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. रामदास स्वामी गुरु होते म्हणणे हि लिखाणाची कमाल आहे. छत्रपती हीच शिवाजी महाराजांची खरी उपाधी होती व आहे” असं शरद पवार बोलताना म्हणाले.

कार्यक्रमाला आल्यापासून पत्रकार याविषयी (जाणता राजा) प्रतिक्रियेसाठी माझ्या पाठीमागे आहेत. मी कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. रामराजे निंबाळकर याविषयावर बोलायला पुरशे आहेत. मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. शिवचरित्राचा नीट अभ्यास केला असता जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना शिवचरित्रात कधीच लावण्यात आली नव्हती, असं म्हणत शरद पवारांनी ‘जाणता राजा’ या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago