कसबा गणपती तर्फे शहीद कुटुंबाचा सन्मान

0
102

सोलापूर/(प्रतिनिधी)१६- देशाचे स्वातंत्र्य अबधित राखण्यासाठी देश सेवार्थ सर्वस्व अर्पण करण्याऱ्या जवानांचे शौर्य अतुलनीय आहे. मात्र मातृभूमीच्या सेवेत समर्पित भावनेने कार्यरत जवानांच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबियांचा देखील मोलाचा वाटा असतो. कुटुंबियांची प्रेरणा, प्रोत्साहन देशाप्रति त्यागाची मिळालेली शिकवण आदी जवांनाच्या जडण घडणित निर्णायक ठरतात मात्र बहुतेकदा शहीदांच्या कुटुंबियांचे योगदान दुर्लक्षितच राहते. स्वातंत्र्य दिनी शहीदांच्या शौर्याचे स्मरण करण्यासह शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याचा श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सोलापूर पोलिस गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय जगताप यांनी व्यक्त केले. बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ आयोजित वीर जवान तुझे सलाम कार्यक्रम अंतर्गत सोलापूर शहर व जिल्हा परिसरातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री मंगल भवनात या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सोलापूर शहर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे संजय जगताप यांच्या हस्ते तथा उपस्थित शहीद कुटुंबियांच्या हस्ते श्री च्या पूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे उत्सव अध्यक्ष सुरज गुंगे ,संजय जगताप, ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, प्रकाश वाले, सुधीर थोबडे, विश्वनाथ शरणार्थी, बाळासाहेब भोगडे, केदार मेंगाणे, संजय दर्गोपाटील, नगरसेवक नागेश भोगडे, मल्लिनाथ दर्गोपाटील, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकुर, सिद्धाराम बुगडे, आप्पासाहेब कुताटे, बिपीन धुम्मा आदी उपस्थित होते. मंडळ उत्सव समिती अध्यक्ष सूरज गूंगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात  शहिद मोहम्मद मोहसिन गुलाम शेख – वीरपत्नी साजिया मोहम्मद मोहसिन गुलाम शेख, शहिद प्रभाकर काटकर – वीरपत्नी कलावती प्रभाकर काटकर, शहिद प्रभाकर पात्रे – वीरपत्नी बबीता प्रभाकर पात्रे, शहिद नायब सुबेदार मधुकर सोपान भोसले –  वीरपत्नी कांता मधुकर भोसले, शहीद परमानंद शिवाजी माने – वीरपत्नी सविता परमानंद माने आदी शहीद कुटुंबियांचा शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आले.

या प्रसंगी जगदेवी गुंगे, पुष्पा भोगडे, विद्याताई जोडभावी, सुनिता कडगंची, बाळासाहेब मुस्तारे, सिद्धाराम जोडभावी, नागनाथ मेंगाणे, अमित गुंगे, योगिराज भोगडे, कैलास मेंगाणे, आनंद मुस्तारे, अमर चव्हाण, गणेश मेंगाणे, संदीप कुरडे, ओकांर राजमाने, विनायक शरणार्थी, रोहीत कुताटे, श्रीशैल भोगडे, गिरिराज निंगदळी, पुष्कराज मेत्री, विशाल कोळकुर, सुमित हब्बु, सिद्धेश आळंद, रोहीत बिराजदार, अमित सिंदगी, सागर हिरेहब्बु, राहुल वर्दा, संगमेश गुंगे, नीलेश मसरे, जयराज कुरडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश इंडी यांनी तर सूत्रसंचालन किशोर बुगडे यांनी केले.

चौकट ओळ-

शाहिद कुटुंबातील नावे

१) शहिद मोहम्मद मोहसिन गुलाम शेख – वीरपत्नी साजिया मोहम्मद मोहसिन गुलाम शेख

२) शहिद प्रभाकर काटकर – वीरपत्नी कलावती प्रभाकर काटकर

३) शहिद प्रभाकर पात्रे – वीरपत्नी बबीता प्रभाकर पात्रे

४) शहिद नायब सुबेदार मधुकर सोपान भोसले –  वीरपत्नी कांता मधुकर भोसले

५)शहीद परमानंद शिवाजी माने – वीरपत्नी सविता परमानंद माने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here