Categories: राजकीय

महिलांसाठी उद्योग उभारा ; जागेसह आर्थिक सहकार्य देणार – दिलीप माने

सोलापूर- ( प्रतिनिधी ) –

महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी उद्योग उभारा , आर्थिक सहकार्य करण्याबरोबर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन शहर मध्यचे महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांनी दिले.शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मी विष्णू चाळीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते.या जाहीर सभेला भर पावसातसुद्धा महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

उमेदवार माने म्हणाले,मध्य मतदारसंघात कामगारांची संख्या मोठी आहे मात्र रोजगार नसल्याने हाताला काम नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.उद्योग उभारण्याबरोबरच उद्योग वाढीला चालना देऊन महिलांच्या हाताला काम देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.पापड उद्योगाबरोबर अन्य वेगवेगळे उद्योग उभारा माने बँकेतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक तथा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, या भागात ड्रेनेजची मोठी समस्या आहे ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे.आणि त्यासाठी आपणास आमदार करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू.महापालिका निवडणुकीत जसे या भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळाले तितकेच मताधिक्य दिलीप माने यांना देण्याचे आवाहनही जिल्हाप्रमुख वानकर यांनी केले. या भागातून भरघोस मतांनी माने यांना निवडून देऊ असे राजू डोंगरे म्हणाले.

यावेळी सेनेचे जेष्ठ नेते प्रकाश वानकर,अशोक भोसले, राजू डोंगरे,चंद्रकांत धुमाळ,चंद्रकांत मेकाले,लहू गायकवाड, वजीर शेख,विठ्ठल वानकर,ज्योतीबा चांगभले, अरुण जाधव, राजू शेख,मारुती शिंदे, लक्ष्मी बंडगर,राणी सरवदे,संगीता हरवाळकर,गीता डुकरे, चौगुले ताई यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अपक्ष मनीष गायकवाड यांचा माने यांना पाठिंबा

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष उभे असलेले मनीष गायकवाड यांनी या सभेवेळी सेनेचे उमेदवार दिलीप माने यांना पाठिंबा दिला.शहर मध्यच्या विकासासाठी आपण जाहीर पाठिंबा दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले

MH13 News

Recent Posts

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

15 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

20 hours ago

BREAKING: महाशिवआघाडी – सरसकट कर्जमाफी आणि 24 तास वीज प्राधान्यक्रमावर!

MH13 NEWS NETWORK: राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद…

21 hours ago