सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network

सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

येत्या सोमवारपासून नववी, दहावी व बारावीच्या शाळा व कॉलेज सुरू होणार असून त्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व शाळेतील व महाविद्यालयातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज उपायुक्त धनराज पांडे यांनी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाची पाहणी केली.

यावेळी उपायुक्त पांडे आणि अधिकाऱ्यांनी शाळेत व महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीची सोय करण्यात आलेली आहे याची माहिती घेतली तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये फक्त महत्त्वाच्या विषय घ्यावे व उरलेल्या विषय ऑनलाइन पध्दतीने घेण्यात यावे आणि 50 टक्के विद्यार्थ्यांना घेऊन शाळा सुरू करावे

दरम्यान, शाळेतील वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग व मास्क ,हॅन्ड सॅनिटयाजरचा वापर करण्यासंदर्भात व जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात त्या शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.

कोणत्याही शिक्षकांना अथवा विद्यार्थ्यांना लक्षणे दिसली की त्यांनी महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच शाळेतील मुख्याध्यापक व महाविद्यालयातील प्राचार्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात बाबत उपायुक्त धनराज पांडे यांनी सूचना दिल्या. यावेळी महापालिकेचे प्रशासन अधिकारी कादर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago

रॅन्समवेअर | एक खंडणी मागणारा व्हायरस, जाणून घ्या…

MH13 NEWS Network कॉम्प्युटर व्हायरस हे काही आता नवीन राहिले नाहीत. व्हायरस हे विविध प्रकारचे…

4 days ago