कामगार वस्तीत ‘सारथी’चा आधार ; आरोग्य शिबीर,औषधे…

MH13 News Network

सोलापूर – येथील सारथी युथ फाउंडेशन व सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक नगर येथे आज परिवहनचे मोबाईल क्लिनिक आणून आरोग्य शिबीर राबविण्यात आले.
कोरोना महामारी काळात, आर्थिक स्थिती बिकट बनल्याने नागरिकांना दवाखान्यात जाऊन तपासणी व उपचार घेता येत नाही. अशा गरजू कामगार वस्तीत जाऊन मोफत तपासणी व मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन सारथी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बुधवारी विनायक नगरमधील राजराजेश्वरी प्रशाला येथे शिबीर घेण्यात आले.
शिबिराच्या शुभारंभाप्रसंगी या भागाचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर उपस्थित होते. कामगार वस्तीत या शिबिराची गरज आहे, सारथी युथ फाउंडेशनने घेतलेले हे शिबिर स्तुत्य आहे, असे मत नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी व्यक्त केले.
मोबाईल क्लिनिकमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका मोरे ,डाॕ.सायका पठाण व एक्सरे टेक्निशियन रेहमान नगारे यांनी रुग्णांची तपासणी करुन, मोफत औषधे वाटप केली. शिबिरात ६४ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये रुग्णांचे एक्स रे तपासणी देखील करण्यात आली. आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात पाठविले. या शिबिराचा लाभ निवारा नगर, सिध्दरामेश्वर नगर, माळी नगर, अराफत नगर मधील नागरीकांनी घेतला.

Health campaign

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका मोबाईल क्लिनिकमधील कर्मचारी, सारथी युथ फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. जावेद नगारे, उपाध्यक्ष सिध्देश्वर घोडके, सचिव रामचंद्र वाघमारे, राजराजेश्वरी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, तुकाराम चाबुकस्वार, कविता वाघमारे, दत्तात्रय सनके , राहुल त्रिमल , शिवराज कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago