अखेर..संजयमामांनी ‘या’ पक्षाची मिळवली करमाळा विधानसभेची उमेदवारी.!

संजय पाटील - घाटणेकर यांची राष्ट्रवादीची उमेदवारी रद्द 

0
1273

सोलापूर- ( प्रतिनिधी ) 

करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील – घाटणेकर यांना अगोदरच जाहीर झालेली  उमेदवारी  पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आहे.  त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजय मामा शिंदे यांना त्यांच्या “सफरचंद” या चिन्हासह  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा जाहीर केलेला असून संजय मामा शिंदे हेच  करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरस्कृत उमेदवार असतील अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली .
. प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले,सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मोहोळ, पंढरपूर ,माळशिरस आणि बार्शी या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर अधिकृतपणे  उमेदवार उभे आहेत . करमाळा आणि सांगोला या ठिकाणच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या संदर्भामध्ये पक्षाच्यावतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील यांना अगोदरच जाहीर झालेली  उमेदवारी पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजय मामा शिंदे यांना त्यांच्या “सफरचंद “या चिन्हासह  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा जाहीर केलेला आहे , त्यामुळे संजय मामा शिंदे हेच  करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरस्कृत उमेदवार असतील .  सांगोला मतदारसंघामध्येसुद्धा तशीच  परिस्थिती निर्माण झाली होती .  अजितदादांनी सांगोला आणि करमाळा दोन्हीच्या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे .  सांगोलामध्ये शेतकरी कामगार पक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सर्वांच्यावतीने हा  मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आलेला होता . मध्यंतरी पक्षाच्या पातळीवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंखे – पाटील  यांनी अर्ज दाखल केला होता.  आणि त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता तो अर्ज रद्द करण्यात यावा यासंदर्भातील परिपत्रकहि  काढण्यात आले होते . परिपत्रक वेळेमध्ये ई-मेल द्वारे संबंधित निवडणूक अधिकारी भोसले यांच्याकडे देखील करण्यात आले होते. त्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगोलामध्ये शेतकरी कामगार पक्षासोबत असेल.पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातसुद्धा आमदार भारत भालके हेच राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. शिवाजी काळुंगे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाहीत असा खुलासा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने केला आहे, शिवाय त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे , असेही पाटील म्हणाले.
करमाळासाठी संजय पाटील – घाटणेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती .परंतु  शेवटी कुठलाही पक्ष निवडून येणारा उमेदवार हा त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये महत्त्वाचा निकष मानला जातो.  अनेक वर्षापासून हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झाला होता. रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या नेत्या असल्या तरी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी चालू असताना संजय मामा शिंदे यांच्याकडे प्रस्ताव आला.  परंतु त्या ठिकाणची राजकीय समीकरणे लक्षात घेता त्यांनी अपक्ष आणि त्याच वेळेला त्यांना पुरस्कृत करण्याबाबत चर्चा झाली. चंद्रकांत सरडे आणि  संजय मामा शिंदे हेच त्या ठिकाणी  अधिकृत उमेदवार जाहीर झाले असले तरीसुद्धा आपण पक्षपातळीवर त्याठिकाणी निर्णय घेऊन संजय मामा शिंदे यांना पक्षाने पुरस्कृत केले केले असल्याचे उमेश पाटील म्हणाले.अशा पद्धतीचे प्रसंग येतात याची कल्पना आहे.घाटणेकर यांच्यावर अन्याय झालेला आहे , तरीसुद्धा शरदचंद्र पवार आणि अजितदादांच्यावतीने चर्चा करून घाटणेकर यांची काळजी घेतली जाईल आणि त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातील असे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here