सांगोला | ‘जनता कर्फ्यू’ बाबत बैठकीत काय ठरले तर ‘यांचा’ विरोध …

सांगोला/प्रतिनिधी:-

कोरोनाने तालुक्यात मोठे रान व्यापले असून यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने व्यापारी वर्ग व नागरिकांनी तालुक्यातील कोरोनाचे  गांभीर्य लक्षात घ्यावे. आरोग्य खात्याच्या अहवालानुसार येत्या १५ दिवसात ८ ते १० हजार कोरोना बाधित रुग्णांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे अशा स्थितीत रुग्णांना ठेवण्यासाठी देखील जागा उपलब्ध राहणार नाही.  त्यामुळे कोरोनास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिक व व्यापारी वर्गाने जनता कर्फ्यू करण्याचा विचार करावा. येत्या ४ ते ५ दिवसातील कोरोनाचे स्थिती लक्षात घेऊन व  अधिकार्‍यांची बैठक बोलावून व्यापाऱ्यांचे मत विचारात घेऊन जनता कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मत आ. शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

काल रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनता कर्फ्यू बाबत चर्चा करण्यासाठी व्यापारी वर्ग व नागरिकांची सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी  माजी आम.  दीपक आबा साळुंखे पाटील,  माजी आम.  गणपतराव देशमुख, प्रा.पी.सी. झपके, भाजपचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार, भाऊसाहेब रुपनर,  जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, पंचायत समिती सभापती राणी कोळवले, नगराध्यक्ष राणी माने,  नगरसेविका अप्सरा ठोकळे, छाया मेटकरी, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, आनंद घोंगडे, विनोद बाबर, गिरीश गंगथडे, सुरज बनसोडे, नवनाथ पवार, पंचायत समिती सदस्य नारायण जगताप, भाजप शहर प्रमुख आनंद भाटे, दीपक (गुंडा) खटकाळे, दादा खडतरे, अनील खडतरे , गजानन बनकर, श्रुतिका लवटे, प्रफुल्ल कदम यांसह व्यापारी वर्ग उपस्थित होता.
सदर बैठकीमध्ये उपस्थित व्यापारी वर्गाने सांगोला मध्ये जनता कर्फ्यू करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला.  यावेळी पुढे बोलताना आ.  शहाजीबापू पाटील म्हणाले की कोरोना हा चेष्टेचा विषय नसून ही अत्यंत गंभीर बाब आहे.  घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्याशिवाय कोरोनाचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येत नाही.  कोरणामुळे अनेक भगिनी विधवा होऊ लागल्या आहेत. तसेच आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या १५ दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची  संख्या ८ ते १० हजार वर जाण्याची शक्यता दिसून येत आहे.  अशावेळी कोरोना बाधित रुग्ण ठेवण्यासाठी देखील जागा उपलब्ध होणार नाही.  सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्व व कोवीड केअर सेंटर मधील कॉट भरलेल्या असल्याने उद्यापासून फॅबटेक कॉलेज वर कोरोनाबाधित रुग्णांची सोय करण्यात येणार आहे.  संबंधित कॉलेजवर वरील देखील  मर्यादा संपली तर या पुढील काळात परगावी कोरणा बाधित रुग्ण  पाठवावे लागतील. कोरोना या रोगावरील लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी कोरणा सोबत शिस्तीत जगण्याची सवय बाळगली पाहिजे. नागरिकांनी वाढत्या कोरणा बाधित व मृत्यूंची संख्या लक्षात घेऊन भविष्यात कोरोना बाधितांच्या यादीत आपले देखील नाव येऊ शकते हे ध्यानात धरून विचार करावा.

कोरोना थांबण्यासाठी शासन व प्रशासनाचे विविध प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगातीलच एक प्रयोग म्हणजे जनता कर्फ्यू होय.  तालुक्यामध्ये सध्या सर्व नागरिकांच्या टेस्ट झाल्या नसल्याने कोरोना बाधितांची संख्या बहुतांशी पणे कमी वाटत आहे.  परंतु नागरिकांची जर सलग टेस्ट घेतली तर कित्येक पटीने कोरणा बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . आतापर्यंत प्रशासनाने  मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे सदरच्या गंभीर बाबीचा व्यापारी व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून विचार करावा व निर्णय कळवावा.  तसेच येत्या ४ ते ५दिवसात तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचे येणारे अहवाल समोर ठेवून संबंधित अहवालामधून जर कोरणा बाधित रुग्णांमध्ये घट आढळून आली तर जनता कर्फ्यू करण्याची आवश्यकता भासणार नाही परंतु आकडेवारी जर वाढत चालली तर सांगोल्या समोर जनता कर्फ्यू शिवाय इतर कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने संबंधित विषयासंदर्भात व्यापारी वर्ग व नागरिकांनी आपले निर्णय कळवावे.  सदरचे निर्णय विचारात घेऊन प्रशासनाशी सल्लामसलत करून जनता कर्फ्यू बाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी सदर प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले की, कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम स्वतःपासून बदल केला पाहिजे.  कोरोना कमी होण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे.  जनता कर्फ्यू बाबत केली जाणारी चर्चाही तालुक्यातील नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टीने असल्याने नागरिकांनी क्षणिक विचार करू नये.  कोरणा वरील लस उपलब्ध होईपर्यंत शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी चे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.  व्यापारी वर्गाने देखील आपल्या दुकानांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे व आलेल्या नागरिकाला मास्कचा वापर बंधनकारक ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.  नागरिकांनी जनता कर्फ्यू करण्याची वेळ येणार नाही. परंतु एका नागरिकाचा गहाळपणा इतरांना महागात पडू शकतो.  म्हणून जनता कर्फ्यू करावा लागेल.  आपण प्रशासनाची या विषयावर सविस्तर चर्चा करू.  सांगोला तालुक्यासाठी वेगळी नियमावली सुरू करून कोरोना संदर्भातील सांगोला पॅटर्न तालुक्यासाठी राबवूया असे मत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

16 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago