सोलापूर बंद | सर्वपक्षीय नेत्यांचा जाहीर पाठिंबा ; सकल मराठा समाज बैठकीत सहभाग

सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांची दि. 21 सप्टेंबर च्या बंद च्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते मंडळींची बैठक पार पडली .छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेत आज बुधवारी सायंकाळी बैठकीत सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळी यांनी 21 तारखेच्या मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला जाहीर पाठिंब्याचे पत्र देऊन सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

या बैठकीत काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले ,शिवसेनेचे शहर अध्यक्ष गुरुशांत धुत्तरगावकर , भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख ,राष्ट्रवादी चे अध्यक्ष भारत जाधव , रिपाई आठवले गटाचे राजाभाऊ सरवदे , वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख गणेश पुजारी , एम आय एम चे रियाझ खरादी ,बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष देवा उघडे , मुस्लिम ब्रिगेड चे मातीं बागवान यांनी मनोगत व्यक्त करून बंदला जाहीर पाठिंबा दिला .

आज बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सर्व नेत्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन सर्व पक्षीय नेते मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली .

या बैठकीला के.डी. कांबळे , गौतम चंदनशिवे , फारुख शेख ,राजू हुंडेकरी उपस्थित होते.


या बैठकीला पुरुषोत्तम बरडे , राजन जाधव , चंद्रकांत वानकार , संतोष पवार ,नानासाहेब काळे , शहाजी पवार ,गणेश वानकर ,दिनकर जगदाळे , माउली पवार, विनोद भोसले , भाऊ रोडगे , लहू गायकवाड ,गणेश डोंगरे , संजय जाधव ,जीवन यादव ,प्रकाश ननावरे , दत्ता भोसले , संजय डोंगरे , हनुमंत पवार , सचिन गायकवाड , बाबा सूर्यवंशी ,आदी समाजबांधव मोठया संख्येने हजर होते.
या बैठकीचे सूत्र संचालन आणि प्रस्तावना प्रा.गणेश देशमुख यांनी केली .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

9 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago