सोलापूर बंद | आता माघार नाही ; ‘येथे’ होणार आसूड आंदोलन -सकल मराठा समाज

MH13 News Network

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या सोमवार , 21 सप्टेंबरला सोलापूर शहर व जिल्हा बंद ठेवून जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

सकल मराठा समाज मीटिंग

रविवारी , यासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी प्रशालेच्या क्रीडांगणावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत समाजबांधवांनी आरक्षणप्रकरणी तीव्र भावना व्यक्त करीत केंद्र व राज्य सरकारचा कठोर शब्दांत निषेध केला . तसेच ‘ आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे . आता नाही तर कधीच नाही , एक मराठा लाख मराठा ‘ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला . प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . त्यानंतर जिल्हा समन्वयक माउली पवार यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात सरकारवर घणाघाती आरोप करीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे . अन्यथा हा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगून येत्या 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देऊन मराठा समाज शहर व जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले .

यावेळी मोहोळचे बापू डोके , सांगोल्याचे केदार , दक्षिण सोलापूरचे विनोद पाटील , माढ्याचे प्रा . जी . के . देशमुख , बार्शीचे मंगेश दहीहंडे , सोलापूरचे नितीन चव्हाण , किसन दाडगे , राजन जाधव , निर्मला शेळवणे , उज्ज्वला साळुके , शुभांगी लंबे , प्रियंका डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त करून मराठा आरक्षणाची मागणी केली.


तसेच मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल , असा इशाराही यावेळी देण्यात आला . या बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे , राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे , पद्माकर काळे , प्रवीण डोंगरे , भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार , नगरसेवक विनोद भोसले , अमोल शिंदे , अक्कलकोटचे अमोलराजे भोसले , बाबाराजे निंबाळकर , संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांच्यासह लहू गायकवाड , ज्ञानेश्वर सपाटे , मनीषा नलावडे , लता ढेरे , दत्ता भोसले , सचिन गायकवाड आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . बैठकीचे सूत्रसंचालन प्रा गणेश देशमुख यांनी केले. आभार दत्ता मुळे यांनी मानले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago