सोलापूर | ग्रामीण 453 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; मृत्यू… जाणून घ्या…कोणत्या भागात

MH13News Network

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी दि.19 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 453 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 277 पुरुष तर 176 महिलांचा समावेश होतो.
जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने लागू करण्यात आलेला आहे.तर काही तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पुन्हा बंद ठेवण्यास विरोध केला आहे.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 437 आहे. आज 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 6 पुरुषांचा आणि 5 महिलांचा समावेश होतोय.

आज एकूण 2940 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2487 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 20 हजार 378 इतकी झाली आहे. यामध्ये 12,546 पुरुष तर 7832 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 561 जणांचा मृत्यू झाला आहे यात 386 पुरुष तर 175 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 782 आहे .यामध्ये 4 हजार 361 पुरुष तर 2421 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 13 हजार 35 यामध्ये 7796 पुरुष तर 5239 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 1

बार्शी –नागरी 41 तर ग्रामीण 16

करमाळा –नागरी 26 ग्रामीण 15

माढा – नागरी 8 तर ग्रामीण 71

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 139

मंगळवेढा – नागरी 5 ग्रामीण 6

मोहोळ – नागरी 3 ग्रामीण 15

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5

पंढरपूर – नागरी 21 ग्रामीण 41

सांगोला – नागरी 4 ग्रामीण 21

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 14

आजच्या नोंदी नुसार नागरी -109 तर ग्रामीण भागात 344 असे एकूण 453 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

9 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago